चांद्रयान-3 बद्दल मोठी अपडेट! चांद्रयान-3 चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत पोहोचलं, आता फक्त 1437 किलोमीटर अतंर बाकी

चांद्रयानाबद्दल नवी अपडेट समोर येत आहे. चांद्रयानने बुधवारी आणखी एक कक्षा यशस्वीपणे पार केली आहे

  भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे (ISRO) ऐतिहासिक मिशन चांद्रयान 3 ने (Chandrayaan-3) चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.  शनिवारी 5 ऑगस्टला सायंकाळी 7.15 वाजता चांद्रयान 3 यानाने चंद्राच्या कक्षेत पोहोचला. आता चांद्रयानाबद्दल नवी अपडेट समोर येत आहे. चांद्रयानने बुधवारी आणखी एक कक्षा यशस्वीपणे पार केली आहे. 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान 3 चे यशस्वी प्रक्षेपण केले. तेव्हापासून आत्तापर्यंत चांद्रयानाने सुरळीत प्रवास केला आहे.

  चांद्रयान 3 (chandrayaan-3 Update) आपल्या चंद्र मोहिमेवर सतत पुढे जात आहे. ते चंद्राच्या कक्षेतून चंद्राजवळ येत आहे. 23 ऑगस्टच्या संध्याकाळी चांद्रयान आपले ध्येय पूर्ण करेल, अशी आशा इस्रोने व्यक्त केली आहे.

  इस्रोने ट्विटमध्ये म्हटले आहे. की, “चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ. चांद्रयान -3 ची कक्षा आज केलेल्या युक्तीनंतर 174 किमी x 1437 किमी पर्यंत कमी झाली आहे,”  पुढील ऑपरेशन 14 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 11:30 ते 12:30 दरम्यान होणार आहे, असे त्यात म्हटले आहे. मिशन जसजसे पुढे जात आहे, तसतसे चांद्रयान-3 ची कक्षा हळूहळू कमी करण्यासाठी आणि चंद्राच्या ध्रुवावर ठेवण्यासाठी इस्रोकडून अनेक युक्त्या केल्या जात आहेत.

  बेंगळुरूमधील इस्रोच्या सेंटर टेलीमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) च्या मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स (MOX) मधून चांद्रयान-3 च्या प्रत्येत हालचालीवर सतत लक्ष ठेवलं जात आहे. सध्या चांद्रयान-३ ची सर्व उपकरणे व्यवस्थित काम करत आहेत.

  पुढच्या टप्प्यात काय असेल ?

  स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या पाच फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. चांद्रयान 3 मोहिमेत लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्युल आहे. 16 ऑगस्टपर्यंत हे आता चंद्राभोवती भ्रमण करणार आहे. त्यानंतर 17 ऑगस्टला लँडर प्रोपल्शन मॉड्युलपासून वेगळं होईल. ते चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणारी रेंजची माहिती घेईल. तर लँडर पुढे जात 23 ऑगस्टला चंद्रावर उतरेल.