
चांद्रयान-3 ने आतापर्यंत चांगला प्रवास केला आहे. 14 जुलैला चांद्रयान लॉन्च करण्यात आले होतं.
संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या भारताच्या चांद्रयान-३ मोहीम अंतिम टप्प्यात आलेली आहे. बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनटांनी चांद्रयान-३ उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे. इस्रोने चांद्रयान-३ मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. चांद्रयानपासून वेगळे झालेले लँडर विक्रम आता एकटेच चंद्राकडे जात आहे. तांत्रिक भाषेत, प्रोपल्शन मॉड्यूलसह प्रवास करणारे लँडर वेगळे केले गेले आहे. अल लँडर विक्रमला एकट्यानेच पुढे जावे लागेल. मात्र, इस्रोच्या कडून चांद्रयान-३ मोहीमेबद्दाल अपडेट देण्यात आली आहे. चांद्रयान-३ च्या लँडिंगमध्ये (Chandrayaan 3 Landing Time) काही अडचण आल्यास त्याची लँडिंगची वेळ बदलू शकते. पण चांद्रयान 3 आतापर्यंत प्रवास कसा होता हे जाणून घ्या.
चांद्रयान-3 ने आतापर्यंत चांगला प्रवास केला आहे. 14 जुलैला चांद्रयान लॉन्च करण्यात आले होतं. त्याच्या आतापर्यंतचा प्रवासात चांद्रयान-3 ने काय काय टप्पे पार केले जाणून घ्या.
1) 14 जुलै या दिवशी चंद्रयान 3 170 किलोमीटर × 36,500 किलोमीटर च्या कक्षेत लॉन्च करण्यात आले होते.
2) 15 जुलै या दिवशी पहिली कक्षा 41,762 किलोमीटर × 173 किलोमीटर एवढी वाढवण्यात आले .
3) 17 जुलै या दिवशी दुसऱ्या वेळा कक्षा 41,603 किलोमीटर × 226 किलोमीटर एवढी वाढवण्यात आले.
4) 18 जुलै या दिवशी तिसऱ्या वेळा कक्षा 5,1400 किलोमीटर ×228 किलोमीटर वाढवली.
5) 20 जुलै या दिवशी चौथ्या वेळा कक्षा 17,351 किलोमीटर × 233 किलोमीटर एवढी वाढवली.
6) 25 जुलै या दिवशी पाचव्या वेळा कक्षा 1.27,603 किलोमीटर × 236 किलोमीटर पर्यंत वाढवण्यात आले
7) 31 जुलै ते 1ऑगस्ट च्या रात्री चंद्राने कक्षा सोडली.
8) 17 ऑगस्ट चांद्रयान-3 चे लँडर प्रोपल्शनपासून झाले वेगळे
9) 20 ऑगस्टला चांद्रयानाने त्याचे दुसरे आणि अंतिम डिबूस्टिंग ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडले
चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर काय करेल?
चांद्रयान-३ मिशनमध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलचा समावेश आहे. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील आणि 14 दिवस प्रयोग करतील. तर प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून चंद्राच्या पृष्ठभागावरुन येणार्या रेडिएशनचा अभ्यास करेल. या मोहिमेद्वारे इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचा शोध घेईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप कसे होतात हे देखील कळेल. इस्रोचे माजी शास्त्रज्ञ अन्नादुराई म्हणतात, “चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा प्रदेश देखील शोधला जात आहे कारण त्याच्या सभोवतालच्या कायमस्वरूपी सावलीच्या प्रदेशात पाण्याची उपस्थिती असण्याची शक्यता आहे.”.