राम मंदिरासाठी दिलेले २२ कोटींचे चेक बाऊन्स

“चेक भरताना अनेक चुका झाल्या आहेत. यामध्ये तारीख आणि रक्कम लिहिण्यात झालेल्या चुकांशिवाय काही चेक स्वाक्षरी न जुळल्याने बाऊन्स झाले आहेत. ही एक किरकोळ चूक आहे. काही वेळा भक्त धनादेश पाठवतात, पण चुकांकडे लक्ष देत नाहीत.

    नवी दिल्ली – राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी समर्पण मोहिमेत २२ कोटी रुपयांचे १५ हजार चेक बाऊन्स झाले आहेत. याबाबत श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज म्हणाले की, धनादेश देणाऱ्यांच्या भावना चुकीच्या नाहीत. त्यांची कुठेतरी चूक झाली आहे. अयोध्येतील सर्किट हाऊस येथे राम मंदिर निर्माण समितीच्या दोन दिवसीय बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

    महंत गोविंद देव गिरी म्हणाले, “चेक भरताना अनेक चुका झाल्या आहेत. यामध्ये तारीख आणि रक्कम लिहिण्यात झालेल्या चुकांशिवाय काही चेक स्वाक्षरी न जुळल्याने बाऊन्स झाले आहेत. ही एक किरकोळ चूक आहे. काही वेळा भक्त धनादेश पाठवतात, पण चुकांकडे लक्ष देत नाहीत.

    ते म्हणाले, “चेक बाऊन्स होणे ही भक्तांची चुकीची भावना आहे असे ट्रस्ट मानत नाही. राम मंदिर ट्रस्टने भाविकांवर जबरदस्ती केली नाही. कोणतीही वसुली झाली नाही. सर्व लोकांनी स्वेच्छेने दान केले होते. ३५०० कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.