आंघोळ टाळण्यासाठी कारमध्ये लपला 5 वर्षीय चिमुकला, कार आतुन लॅाक झाला अन् घात झाला..

गुजरातमधील राजकोटमध्ये आंघोळ करावी लागू नये म्हणून 5 वर्षांचा मुलगा कारमध्ये लपला. कार आतून लॉक झाल्याने तो अडीच तास आत अडकून पडला होता. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला असता तो कारमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आला

    राजकोट : लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. कधी जेवणासाठी कधी आंघोळीसाठी नकार देत आईवडिलांना घरभर त्यांच्यामागे पळायला लावने हे असं चित्र जवळपास सगळ्याचं घरी दिसतं. मात्र, आंघोळीला नकार देत त्याला टाळण्यासाठी एका चिमुकल्याने जे केलं त्यामुळे मात्र, त्याला त्याचा जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना  गुजरातमधे घडली आहे.  राजकोटमध्ये एका ५ वर्षाच्या निष्पाप मुलगा अंघोळ करायला लागू नये म्हणून कारमध्ये लपला. कार आतून बंद झाल्याने त्याचा गुदमरून मृत्यू  (child died due to stuck in car) झाला. गुजरातमधील जुनागढ जीआयडीसीमध्ये 23 सप्टेंबर रोजी ही घटना घडली.
    जुनागढ जीआयडीसीमध्ये एका प्लास्टिकच्या वस्तू बनवण्याच्या कारखान्यात उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील कांचनपूर एक जोडपं काम करत होतं. त्यांना दोन मुलं असून एक तीन वर्षाचा तर दुसरा पाच वर्षाचा आहे.  कारखान्याच्या मालकाने दिलेल्या एका छोट्या खोलीत ते राहत होते.मृत मुलाचे वडील रवींद्र भारती यांनी सांगितले की, त्यांची पत्नी त्यांच्या 3 वर्षाच्या मुलाला अंघोळ घालत होती. आंघोळ झाल्यावर तिला 5 वर्षांय आदित्यला आंघोळ घालायची. पण आदित्यला फक्त अंघोळ करायची होती म्हणून तो तिथून पळून गेला. त्याला एक कार दिसली आणि तो आत गेला. ही गाडी लॉक केलेली नव्हती. गाडीच्या आत जाताच ती आपोआप लॉक झाली.

    अडीच तास गाडीत अडकला

    पोलिसांनी सांगितले की, आदित्य जवळपास अडीच तास कारमध्ये अडकला होता. गाडीच्या आत गुदमरल्याने गंभीर जखमी. भावाला आंघोळ घालून त्याची आई बाहेर आली तेव्हा आदित्य दिसला नाही. त्याचा शोध सुरू केला. तो कुठेच न सापडल्याने त्याच्या वडिलांनी कारखाना मालकाला सीसीटीव्ही तपासण्याची विनंती केली. कॅमेऱ्यात आदित्य गाडीजवळ फिरताना दिसला, पण त्यानंतर त्याचा पत्ता लागला नाही.

    कारमध्ये आढळला बेशुद्धावस्थेत

    त्यांनी कारजवळ जाऊन दरवाजा उघडला असता आदित्य बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. आदित्यला जुनागढच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे त्याची प्रकृती पाहता त्याला राजकोटच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.