कोरोनानंतर मुलांना स्ट्रोकचा धोका अधिक; वेळीच द्या लक्ष, ‘या’ संकेतांकडे करू नका दुर्लक्ष

कोरोना महामारीनंतर (Corona) आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. आता एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, धोका वाढू शकतो. अमेरिकेत केलेल्या न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

  नवी दिल्ली : कोरोना महामारीनंतर (Corona) आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. आता एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, धोका वाढू शकतो. अमेरिकेत केलेल्या न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. मार्च 2020 ते जून 2021 दरम्यान रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे स्ट्रोक आलेल्या रुग्णालयात दाखल झालेल्या 16 रुग्णांची माहिती आणि निदान प्रक्रियेचा अभ्यासात आढावा घेण्यात आला.

  बहुतेक प्रकरणे फेब्रुवारी ते मे 2021 च्या दरम्यान आली आहेत. मुलांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे समोर आल्यानंतर काही दिवसांनी हे झाले आहे. संशोधकांनी सांगितले की, यापूर्वी 5 रुग्णांना कोविड संसर्ग झाला नसल्याची पुष्टी झाली होती. मुलांमध्ये स्ट्रोक येण्याचा धोका तुलनेने कमी आहे. परंतु कोरोनानंतर धोका आहे.

  मुलांमध्ये स्ट्रोकची लक्षणे

  • अचानक पॅरालिसीस किंवा अशक्तपणा (विशेषतः चेहरा, हात किंवा पाय).
  • अचानक बोलण्यात किंवा समजण्यात अडचण
  •  अचानक डोळ्यांच्या समस्या (जसे की अंधूक किंवा डबल दिसणं).
  • उलट्या किंवा मळमळ
  • शुद्ध हरपणे