चीन आम्हाला डोळे दाखवत आहे; आम्ही त्याचा व्यवसाय वाढवत चीनला श्रीमंत करत आहोत, केजरीवाल यांची केंद्रावर टिका, स्पष्टच दिला इशारा…

एकीकडे आपण प्रसारमाध्यमांमध्ये वाचतो की काही वर्षांपासून चीन आपल्या सीमेवर डोळा ठेवून आहे. ही आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. त्यांच्याशी लढण्यात आमचे सैनिकही मागे नाहीत, पण त्यांना साथ देणे हे आमचे कर्तव्य आहे. आपण चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे, असं केजरीवाल म्हणाले.

    नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी बुधवारी छत्रसाल स्टेडियमवर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) समारंभात ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी चीनच्या (China) घुखखोरीवर चिंता व्यक्त करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिकांनी आपला जीव धोक्यात घालून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. ते ठेवणे आपल्यावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. एकीकडे आपण प्रसारमाध्यमांमध्ये वाचतो की काही वर्षांपासून चीन आपल्या सीमेवर डोळा ठेवून आहे. ही आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. त्यांच्याशी लढण्यात आमचे सैनिकही मागे नाहीत, पण त्यांना साथ देणे हे आमचे कर्तव्य आहे. आपण चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे, असं केजरीवाल म्हणाले.

    परंतु आपण त्याचा व्यापार वाढवत आहोत. 2020 मध्ये भारताने चीनकडून $65 अब्ज आणि 2021 मध्ये $95 अब्ज किमतीच्या वस्तू खरेदी केल्या. आम्हाला आमच्याच लोकांची चिंता नाही, आम्ही चीनला श्रीमंत करत आहोत. आम्ही त्यांच्याकडून खरेदी करत असलेल्या सर्व वस्तू बनवता येतात आणि येथेही बनवल्या जात असल्याचे केजरीवाल म्हणाले. यामुळे आपल्या लोकांना रोजगार मिळेल. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे गेल्या काही वर्षांपासून सुमारे 12 लाख व्यापाऱ्यांनी देश सोडला, असा दावा त्यांनी केला, असा जोरदार हल्लाबोल केजरीवाल यांनी मोदी सरकारवर केला. दरम्यान, दिल्लीतील जीएसटीबाबत त्यांनी भाष्य केले. जीएसटीची किचकट प्रक्रिया सुलभ करून व्यापाऱ्यांना मदत केली पाहिजे. अगदी 3-4 दिवसांपूर्वी मी तेलंगणाला गेलो होतो. तेथे सर्वांचे डोळे मोफत तपासले जात आहेत. सरकार 4 कोटी लोकांची चिंता करत आहे. आम्ही हे दिल्लीतही करू

    दरम्यान, पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले की, आम्ही गेल्या 7-8 वर्षांत दिल्लीत खूप काम केले आहे. दिल्लीत सर्वात कमी महागाई असल्याचेही केंद्राच्या अहवालात म्हटले आहे. दिल्लीत महागाई दर फक्त ३ टक्के आहे. येथे वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्य सेवा मोफत आहेत. महिलांसाठी बस प्रवास, वृद्धांसाठी तीर्थयात्रा आणि रेशनही मोफत आहे. मी केंद्राला आवाहन करतो की, गेल्या वर्षभरात अनेक खाद्यपदार्थांवर जीएसटी लावण्यात आला आहे. दूध आणि दहीही महाग झाले आहे. या गोष्टींवरून जीएसटी काढला पाहिजे.