भारतीयांच्या ‘आधार’ डेटाबेसवर Chinese hackers चा हल्ला

आधारचा डेटाबेस एन्क्रिप्टेड (Adhaar database encrypted) असून, केवळ सरकार आणि त्या-त्या वापरकर्त्यांनाच ही माहिती उपलब्ध असल्याचे यूआयडीएआयकडून स्पष्ट करण्यात आले.

    दिल्ली: `सर्व भारतीयांविषयीची प्राथमिक माहिती असणाऱ्या ‘आधार’च्या डेटाबेसवर (Adhaar database attacked) चिनी हॅकर्सनी हल्ला (Chinese hackers ) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यूआयडीएआयच्या (UIDIA ) डेटाबेसमध्ये म्हणजे आधारकार्ड संबंधीच्या संस्थेकडे जवळपास एक अब्जाहून अधिक भारतीयांची माहिती ठेवण्यात आली आहे. त्यावर चिनी हॅकर्सनी हल्ला केल्याचं रेकॉर्डेड फ्युचर (Record Future) या सायबर सिक्युरिटी फर्मने म्हटले आहे. या वर्षी जून आणि जुलैच्या दरम्यान हा हल्ला करण्यात आला होता. अर्थात, यातून कोणती माहिती चोरण्यात आली की नाही याबाबत कल्पना नसल्याचे ही फर्मने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

    सरकारने मात्र हा दावा फेटाळला आहे. अशा प्रकारचा कोणताही सायबर हल्ला झाल्याचे दिसून आले नाही, असे सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. आधारचा डेटाबेस एन्क्रिप्टेड (Adhaar database encrypted) असून, केवळ सरकार आणि त्या-त्या वापरकर्त्यांनाच ही माहिती उपलब्ध असल्याचे यूआयडीएआयकडून स्पष्ट करण्यात आले. आधारचा डेटाबेस अत्यंत सुरक्षित ठिकाणी आहे.

    तसेच, याची सिक्युरिटी सिस्टीमही वेळोवेळी अपग्रेड करण्यात येते, असंही सरकारी अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्रात सांगण्यात आलं. ‘एनडीटीव्ही’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले असून देशातले अग्रगण्य मीडिया हाउस असलेल्या टाइम्स ग्रुपलाही (Times group attacked) चिनी हॅकर्सनी लक्ष्य केले होते असे रेकॉर्डेड फ्युचरच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या वर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्टदरम्यान टाइम्सच्या डेटाबेसवर (Times database cyber attack) हल्ला करण्यात आला होता; पण यातूनही कोणती माहिती चोरण्यात आली की नाही याबाबत माहिती नसल्याचे रेकॉर्डेड फ्युचरने स्पष्ट केले आहे.