चॉकलेट अडकल्याने श्वास कोंडला गेला अन् चिमुकल्याचा झाला मृत्यू

लहान मुलांना चॉकलेट व टॉफी खूप (Chocolate) आवडतात. मात्र, कोणी कल्पनाही केली नसेल की, चॉकलेटही मुलाचा जीव घेऊ शकते. मात्र, अशीच एक घटना गौतमबुद्धनगर जिल्ह्यातील कस्बा रबपुरा येथे घडली आहे. येथे टॉफी खात असलेल्या चार वर्षीय मुलाच्या घशात ही टॉफी अडकली.

    नवी दिल्ली : लहान मुलांना चॉकलेट व टॉफी खूप (Chocolate) आवडतात. मात्र, कोणी कल्पनाही केली नसेल की, चॉकलेटही मुलाचा जीव घेऊ शकते. मात्र, अशीच एक घटना गौतमबुद्धनगर जिल्ह्यातील कस्बा रबपुरा येथे घडली आहे. येथे टॉफी खात असलेल्या चार वर्षीय मुलाच्या घशात ही टॉफी अडकली. यामुळे मुलाचा श्वास कोंडला व त्यातच याचा मृत्यू झाला. मुलाचा डोळ्यासमोर अचानक मृत्यू (One Child Died) झाल्याने कुटुंबीयांनी आक्रोश केला.

    रबपुरा येथील मोहल्ला शांतिनगर येथे ही घटना घडली. येथील रहिवाशी शाहरुख यांचा 4 वर्षाचा मुलगा सान्याल याला चॉकलेटची चांगली आवड होती. त्यामुळे तो सोमवारी दुपारच्या सुमारास दुकानातून टॉफी खरेदी करण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याने खरेदी केलेले चॉकलेट तो खात होता. मात्र, याचदरम्यान, टॉफी त्याच्या गळ्यात जाऊन अडकली. यामुळे या लहान मुलाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

    मुलाच्या घशात चॉकलेट अडकल्याचे समजल्यानंतर त्याच्या घरच्या लोकांनी त्याच्या गळ्यात अडकलेली टॉफी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला आणखीनच त्रास होऊ लागला. यामध्येच त्याचा श्वास कोंडला गेला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.