NCP's Online Statewide Employment Rally: Nawab Malik Target of 80,000 jobs;

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) ने कॉन्स्टेबल/ फायरच्या पदावरील भरतीची सूचना जारी करण्यात आली आहे. तब्बल ११४९ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया (CISF Recruitment 2022) राबवण्यात येत आहे.

    नवी दिल्ली: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) ने कॉन्स्टेबल/ फायरच्या पदावर भरतीसाठी सूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार (CISF Jobs) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF Recruitment) www.csifrectt.in या वेबसाईटवर अर्ज करू शकतात. ४ मार्च २०२२ ही या अर्जासाठीची शेवटची तारीख असणार आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल ११४९ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. खुल्या प्रवर्गात ४८९ पदं, ईडब्लूएस (EWS) ११३, एससी १६१, एसटी १३७ आणि ओबीसी २४९ जागासांठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

    सीआयएसफतर्फे ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज स्वीकारले जातील. अन्य कोणत्याही मार्गानं अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षा, ओएमआर पद्धतीनं बहुपर्यायी प्रश्न स्वरुपात घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना २१ हजार ७०० ते ६९ हजार रुपये पगार मिळेल. अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना डीसीपीएस पेन्शन सेवा लागू असेल.

    शुल्क
    ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी एससी, एसटी आणि माजी सैनिक या प्रवर्गातील उमेदवार सोडून इतरांना १०० रुपये शुल्क भरावं लागणर आहे. यूपीआय किंवा डेबिट कार्ड द्वारे ते शुल्क जमा करु शकतात.

    शैक्षणिक पात्रता व अटी
    या भरती प्रक्रियेसाठी फक्त पुरुष उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय १८ ते २३ दरम्यान असायला आहे. याशिवाय उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डाशी संलंग्नित महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केलेले असावे.