दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संभाजीराजे छत्रपती यांची घेतली भेट, चर्चांना उधाण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर (Delhi tour) असून, त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. दोन नेत्यामध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती समोर येत नाहीय, पण भेटीमागचे कारण काय याची सुद्धा चर्चा आहे.

    नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी आज नवी दिल्लीत (Delhi) माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांची सदिच्छा भेट घेतली. यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर (Delhi tour) असून, त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. दोन नेत्यामध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती समोर येत नाहीय, पण भेटीमागचे कारण काय याची सुद्धा चर्चा आहे.

    दरम्यान, दिल्लीत मुख्यमंत्री असल्यानं मराठा आरक्षण यावर केंद्रीय पातळीवर चर्चा व्हावी यासाठी संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची सुत्रांची माहिती आहे. दरम्यान, यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावरील पुस्तक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट दिले. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, हेमंत पाटील आणि माजी आमदार अभिजीत अडसूळ उपस्थित होते.