
कर्नाटकात अमूल दूध विक्रीला (Karnataka Amul Milk Issue) जोरदार विरोध करण्यात आला होता. त्यानंतर आता तमिळनाडूनेही अमूल दूध खरेदीला विरोध केला आहे. याबाबत तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (M.K. Stalin) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना पत्र लिहून अमूलला तमिळनाडूतून दूध खरेदीवर तातडीने बंदी आणावी, अशी विनंती केली आहे.
चेन्नई : कर्नाटकात अमूल दूध विक्रीला (Karnataka Amul Milk Issue) जोरदार विरोध करण्यात आला होता. त्यानंतर आता तमिळनाडूनेही अमूल दूध खरेदीला विरोध केला आहे. याबाबत तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (M.K. Stalin) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना पत्र लिहून अमूलला तमिळनाडूतून दूध खरेदीवर तातडीने बंदी आणावी, अशी विनंती केली आहे.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, तामिळनाडूमध्ये दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी आविन पशुखाद्य, चारा, खनिज मिश्रण आणि पशु आरोग्य सेवा आणि प्रजनन सेवा यांसारखी विविध संसाधने देखील पुरवते. याशिवाय, ते देशातील काही सर्वात कमी किमतीत ग्राहकांना उच्च दर्जाचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा करते. इथल्या ग्रामीण जीवनातील लाईफलाईन आहे, असेही सांगण्यात आले आहे.
तामिळनाडूत अमूलला रोखावे
तामिळनाडूत आविन हा आमचा सर्वोच्च सहकारी विपणन महासंघ आहे. त्याच्या दूध उत्पादन क्षेत्रातून अमूलने दूध खरेदी करणे हे अतिक्रमण आहे. त्यामुळे अमूलला तमिळनाडूतून दुधाची खरेदी करण्यापासून त्वरित रोखावे, असेही मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी अमित शहा यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.