CNG दरात वाढ, महागाईचा आणखी एक झटका; जाणून घ्या किती आहे किंमत

सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. दिल्लीसह देशातील इतर भागांमध्ये कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे.

    दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) ची किंमत प्रति किलो 2 रुपयांनी वाढली आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने देशाच्या इतर भागांमध्येही CNG च्या किमतीत वाढ केली आहे. सीएनजीची नवी किंमत आज (रविवार) सकाळपासून लागू करण्यात आली आहे.

    दिल्ली-एनसीआरमध्ये आता सीएनजीची किंमत किती आहे?

    इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने केलेल्या वाढीनंतर सीएनजीची किंमत आता दिल्लीत ७३.६१ रुपये प्रति किलो, नोएडामध्ये 76.17 रुपये आणि गुरुग्राममध्ये 81.94 रुपये प्रति किलो झाली आहे.

    इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने नवीन किंमत जाहीर केली

    दरम्यान, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने देशाच्या इतर भागातही सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. हरियाणाच्या रेवाडीमध्ये CNG 84.07 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. त्याच वेळी, कर्नाल आणि कैथलमध्ये 82.27 रुपये प्रति किलो; कानपूर, हमीरपूर आणि फतेहपूरमध्ये सीएनजीची किंमत 85.40 रुपये प्रति किलो आणि अजमेर, पाली आणि राजसमंदमध्ये 83.88 रुपये प्रति किलो झाली आहे.