Cold alert for Vidarbha, Nagpur 8.3 degrees Celsius and Gandia 8.8 degrees Celsius
file photo

विदर्भासोबतच मराठवाड्यातील आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यातही थंडी वाढली आहे.

    गोंदिया : सध्या राज्यात थंडी पडायला सुरुवात झाली आहे. राज्यात काही ठिकाणी थंडीचा  कडाका (Cold Weather) जाणवत आहे तर काही ठिकाणी  ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.दरम्यान विदर्भात तापमानाचा (Temperatures) पारा चांगलाच घसरला आहे. गोंदिया जिल्ह्यात  8.8 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गोंदिया विदर्भातील सर्वात थंडगार जिल्हा ठरला आहे.

    [read_alsocontent=”https://www.navarashtra.com/maharashtra/transgender-can-also-have-a-chance-in-the-police-department-the-historic-decision-of-the-bombay-high-court-nrps-352363/~आता तृतीयपंथीयांनाही पोलीस विभागात संधी, मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!”]

    बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर देखील होत असल्याचं सध्या चित्र दिसत आहे.  यामुळे काही ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. विदर्भासोबतच मराठवाड्यातील आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यातही थंडी वाढली आहे. अशातच , गोंदिया जिल्ह्याचा पारा वर जात असतानाच अचानक दोन दिवसापासून त्यात घसरण होत असल्याच दिसत आहे. गोंदिया जिल्ह्यात सध्याचं तापमान 8.8 अंशावर आहे. त्यामुळे  गोंदिया जिल्हा विदर्भात सर्वात थंडगार ठरला आहे. थंडीपासून बचावासाठी लोकं ठिकठिकाणी शेकोटी आणि उबदार कपड्यांचा वापर करताना दिसत आहेत.