RPI direct offer, Ramdas Athawale Offer, Seema Haider, PUBG, Seema entered India, Lucknow news, RPI Offer to Seema Haider

गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात गाजत असलेले सीमा हैदरचे प्रकरण रोज नवनवीन वळण घेत असताना, तिला अनेक ऑफर मिळत आहे. तिला सिनेमात काम करण्याची ऑफरसुद्धा देण्यात आली होती. आता चक्क आठवलेंच्या आरपीआयकडून निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे.

    लखनऊ : पबजी खेळता खेळता भारतीय तरुणाच्या प्रेमात पडलेल्या, त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी अवैधपणे भारतात आलेल्या सीमा हैदरची सध्या तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. मूळची पाकिस्तानची रहिवासी असलेली सीमा नेपाळमार्गे भारतात शिरली. ती बेकायदेशीरपणे भारतात आल्याचे समजताच पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. मात्र, तिला जामीन मिळाला.

    एटीएसकडून सीमा हैदरची चौकशी सुरू

    उत्तर प्रदेश एटीएसकडून सीमा हैदरची चौकशी सुरू आहे. सीमाला चित्रपटात काम करण्याच्या काही ऑफर मिळाल्या आहेत. याशिवाय गुजरातमधील उद्योजकाने तिला नोकरी ऑफर केली आहे. या पाठोपाठ सीमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने निवडणुकीचे तिकीट देऊ केले आहे.

    रिपाइंनं सीमाला पक्षात येण्याची दिली ऑफर

    एनडीएचा भाग असलेल्या रामदास आठवलेंच्या रिपाइंनं सीमाला पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. सीमानेदेखील त्यांचे आमंत्रण स्वीकारल्याचे वृत्त ‘आज तक’ने दिले आहे. सीमाला पक्षाच्या महिला विंगचे अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमा सातत्याने टीव्ही चॅनेल्सना मुलाखती देत आहेत. त्यातून तिचे संवाद कौशल्य, भाषेवरील पकड स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे सीमाला पक्षाकडून प्रवक्तेपदही दिले जाण्याची शक्यता आहे.

    बाबासाहेबांचा कायदा सांगतो
    सध्या उत्तर प्रदेश पोलीस, दहशतवादविरोधी पथक सीमा हैदरची चौकशी करीत आहे. तपास यंत्रणांनी सीमाला क्लिन चीट दिल्यावर तिला निवडणुकीचे तिकीट देण्यात येईल. रिपाइंच्या तिकिटावर ती निवडणूक लढवेल, असे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. ‘सीमा हैदर पाकिस्तानी नागरिक आहे. ती भारतात आली आहे. जर आपल्या तपास यंत्रणांनी तिला क्लिन चीट दिली, तर तिला भारतीय नागरिकत्व मिळू शकते. सीमाचे पक्षात स्वागत करण्यात येईल. भारतीय नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती निवडणूक लढवू शकते असे बाबासाहेबांचा कायदा सांगतो,’ असं रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेल्या मासूम किशोर यांनी सांगितलं.

    ती एक चांगली वक्ता

    सीमा हैदरची चौकशी सध्या सुरू आहे. तपास यंत्रणा त्यांचं काम करत आहे. त्यांनी तिला दोषी ठरवलेलं नाही. सुरक्षा यंत्रणांनी तिला क्लिन चीट दिल्यास आम्ही तिला प्रवक्तेपद देऊ. कारण ती एक चांगली वक्ता आहे. तिला भारतीय नागरिकत्व मिळाल्यास रिपाइंच्या निवडणूक चिन्हावर ती निवडणूक लढवेल. तसा आमचा प्रयत्न आहे. २०२४ मध्ये आम्ही तिला निवडणुकीत संधी देऊ शकतो. फक्त त्याआधी तिला भारतीय नागरिकत्व मिळायला हवं, असं किशोर म्हणाले.