
गेल्या काही दिवसांपासून जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे (Essential Commodity) दर वाढताना दिसत आहे. त्यात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडर दरवाढीचा भडका उडाला आहे. तेल कंपन्यांकडून एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर केले आहेत.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे (Essential Commodity) दर वाढताना दिसत आहे. त्यात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडर दरवाढीचा भडका उडाला आहे. तेल कंपन्यांकडून एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार एक ऑक्टोबरपासून व्यावसायिक वापराच्या एलपीजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल २०९ रुपयांनी वाढ केली आहे.
व्यावसायिक एलपीजी १९ किलो सिलेंडरसाठी आता तब्बल २०९ रुपये जादा मोजावे लागतील. या दरवाढीमुळे आता देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरचा दर १७३१.५० रुपयांवर पोहोचला आहे. तर आता मुंबईत व्यावसायिक सिलिंडरसाठी १६८४ रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात व्यावसायिक एलपीजीचा दर १०० रुपयांनी घटला होता. मात्र, या तात्पुरत्या दिलासानंतर आता तेल कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात थेट २०९ रुपयांची सामान्य व्यावसायिकांना मोठा झटका दिला आहे.
यापूर्वी ३० ऑगस्ट रोजी घरगुती सिलिंडरचे दर २०० रुपयांनी कमी झाले होते. पण आता व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. ही दरवाढ प्रत्येक शहरात वेगवेगळी असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दिल्लीत व्यावसायिक एलपीजीचा दर २०९ रुपयांनी, कोलकातामध्ये २०३ रुपये आणि मुंबईत व्यावसायिक सिलिंडरसाठी २०२ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.