काँग्रेसचा तिकीट वाटपाचा फॉर्म्युला ठरला; विजयी होणाऱ्यालाच मिळणार तिकीट

2022 च्या निवडणुकीत विजयी होण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांना तिकीट देऊन त्यांना मैदानात उतरवणार आहे. तिकीट वाटपाचा आधारही हाच राहणार आहे.

    डेहराडून, काँग्रेसने (congress) उत्तराखंड निवडणुकीत (uttarakhand election) तिकीट वाटपाचा फॉर्म्युला ठरविला असून जे उमेदवार विजय मिळवू शकतील अशांनाच तिकीट देण्याचे ठरले आहे. याबाबत काँग्रेसच्या प्रदेश निवड समितीने संभाव्य उमेदवारांची निवड व तिकीट वाटपाचा फॉर्म्युला ठरविला आहे. इच्छुकांचे उमेदवारी अर्ज थेट प्रदेश निवड समितीला पाठविण्याचे निर्देश जिल्हा काँग्रेस कमेटींना दिली आहे. या अर्जांची छाननी प्रदेश निवडणूक समितीद्वारे होणार आहे.

    2022 च्या निवडणुकीत विजयी होण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांना तिकीट देऊन त्यांना मैदानात उतरवणार आहे. तिकीट वाटपाचा आधारही हाच राहणार आहे. काँग्रेसच्या 9 सदस्यीय प्रदेश निवड समितीची बुधवारी प्रदेश काँग्रेस कार्यालयात पहिल्यांदा औपचारिक बैठक झाली. यासोबतच पक्षाने दिलेल्या निर्देशानुसार कामकाज सांभाळले आहे.

    निवड समितीचे अध्यक्ष अविनाश पांडे व अजोय कुमार, वीरेंद्र सिंग राठौर यांचा समावेश आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री हरीश रावत, प्रदेश प्रभारी देवेंद्र यादव, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गणेश गोदियाल, प्रीतम सिंग, प्रदेश सहप्रभारी राजेश धर्माणी व दीपिका पांडे सिंग यांचा समावेश आहे.

    पक्ष कार्यालयात इच्छुकांची गर्दी
    यानंतर कार्यकारी अध्यक्षांसोबतच जिल्हा व शहर समितींचे अध्यक्ष इतर प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यात आली. निवड समितीचे अविनाश पांडे यांनी तिकीट वाटपाबाबत निर्देश दिले. या बैठकीमुळे राजीव भवनात कार्यकत्यांची एकच गर्दी झाली होती.