netta desouza

महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसोझा (Netta D’Souza) या पोलीस कर्मचाऱ्यांवर थुंकल्याची घटना घडली आहे. (Netta D'Souza Spits On Cops) या घटनेचा व्हिडिओ व्हायरल(Viral Video) झाला आहे.

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी (Rahul Gandhi ED Inquiry) करण्यात येत आहे.नॅशनल हेराल्डशी संबंधित (national Herald Case) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ही चौकशी सुरु आहे. याविरोधात काँग्रेसकडून देशात सगळीकडे निदर्शने सुरु आहेत. या निदर्शनावेळी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसोझा (Netta D’Souza) या पोलीस कर्मचाऱ्यांवर थुंकल्याची घटना घडली आहे. (Netta D’Souza Spits On Cops) या घटनेचा व्हिडिओ व्हायरल(Viral Video) झाला आहे.

    काँग्रेस ईडीविरोधात करण्यात येणाऱ्या आंदोलनात नेट्टा डिसोझा सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आणि बसमध्ये चढवण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी नेट्टा डिसोझा पोलीस कर्मचाऱ्यांवर थुकंल्या. या घटनेनंतर डिसोझांवर भाजपाकडून टीका सुरु आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रवक्ते शहजाद पोन्नावाला यांनी हा व्हिडिओ ट्विट करत काँग्रेसवर टीका केली आहे.

    “लज्जास्पद आणि घृणास्पद, आसाममध्ये काँग्रेस नेत्यांकडून पोलिसांना मारहाण झाली. हैदराबादमध्ये पोलिसांची कॉलर पकडण्यात आली.  महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसोझा पोलीस आणि महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांवर थुंकल्या”. काँग्रेस अध्यक्षा नेट्टा डिसोझा यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न पोन्नावाला यांनी विचारला आहे.

    नेट्टा डिसोझा यांनी ट्विट करून आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला असून मीडियावर माझ्याविरोधात अपप्रचार केला जात असल्याचा आरोप केला आहे. माझे केस ओढले गेले, चिखलात ढकललं गेलं. चिखल, धूळ आणि केस माझ्या तोंडात गेले, जे मी माझ्या तोंडातून बाहेर काढले. सुरक्षा कर्मचाऱ्यांचा अनादर करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता असे नेट्टा डिसोझा म्हणाल्या. नेट्टा डिसोझा या काँग्रेसच्या महिला शाखेच्या कार्यवाहक अध्यक्षा आहेत.

    दिल्ली भाजपाचे सचिव इम्प्रीत सिंह बक्षी यांनीही हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “ या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. या पोलीस महिलांवर थुंकत आहेत. इतकी खराब, देशविरोधी आणि सैन्यविरोधी मानसिकता असल्यानेच त्यांना काँग्रेसने अध्यक्ष केलं आहे.”