राहुल गांधींची ईडीकडून साडेचार तास चौकशी

राहुल गांधी यांनी काल विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराने अधिकाऱ्यांचे समाधान झालेले नाही. त्यामुळे त्यांना आजही बोलावण्यात आल्याचे सुत्रांकडून समजत आहे. त्यामुळे आजतरी ईडीच्या अधिकाऱ्यांचे समाधान होणार का असा प्रश्न आहे. आज सुमारे साडेचार तासानंतर राहुल गांधी ईडी कार्यालयाबाहेर आलेत. त्यांना आजही ईडीने प्रश्न विचारले.

    नॅशनल हेराल्ड (National Herald)प्रकरणी काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज पुन्हा चौकशी (Enquiry) झाली. काल दिवसभरात सुमारे साडेआठ तास त्यांची चौकशी करण्यात आली. राहुल यांना सकाळी पहिल्या फेरीत ईडी(ED)कडून तीन तास चौकशी झाली. त्यानंतर लंच ब्रेकमध्ये राहुल हे सोनिया गांधींना (Sonia Gandhi) भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तेथून ते पुन्हा ईडीच्या कार्यालयात पोहोचले. त्यानंतर सुमारे साडेपाच तास ही चौकशी झाली. ईडीने राहुल यांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.

    राहुल गांधी यांनी काल विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराने अधिकाऱ्यांचे समाधान झालेले नाही. त्यामुळे त्यांना आजही बोलावण्यात आल्याचे सुत्रांकडून समजत आहे. त्यामुळे आजतरी ईडीच्या अधिकाऱ्यांचे समाधान होणार का असा प्रश्न आहे. आज सुमारे साडेचार तासानंतर राहुल गांधी ईडी कार्यालयाबाहेर आलेत. त्यांना आजही ईडीने प्रश्न विचारले.

    नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात चौकशी झाली. त्याचवेळी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी अकबर रोडवरील मुख्यालयाकडे रवाना झाले. मात्र ते सर्वजण इंडिया गेट सर्कलमध्ये पोहोचताच तेथे आधीच तैनात असलेल्या सुरक्षा दलांनी कोणालाही अकबर रोडच्या दिशेने जाऊ दिले नाही. काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अनिल चौधरी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास आणि अन्य पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेऊन विविध पोलीस ठाण्यात पाठवले. पोलीस कोठडीत घेण्यात आलेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये केसी वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी, गौरव गोगोई, दीपेंद्र हुडा, रणजीत रंजन, सुरजेवाला आदींचा समावेश आहे.

    राहुल गांधी यांना जेवणासाठी वेळ देण्यात आला होता. त्यानंतर राहुल सोनीया गांधी ज्या गंगाराम रुग्णालयात दाखल आहेत तिथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी आई सोनिया यांच्या तब्येतीची चौकशी केली. सध्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनीया गांधी यांना कोरोनाच्या त्रासामुळे गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.