काँग्रेस नेते शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना त्यांच्या लेखन आणि भाषणांसाठी फ्रान्स सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान 'चेव्हलियर दे ला लीजन डी'ऑनर (द लीजन ऑफ ऑनर) मिळाला आहे. या सन्मानाच्या घोषणेनंतर ट्विटरवर थरूर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, थरूर यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

    नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Congress MP Shashi Tharoor) यांना त्यांच्या लेखन आणि भाषणांसाठी फ्रान्स सरकारचा (French Govenrment) सर्वोच्च नागरी सन्मान (Highest Civilian Honor) ‘चेव्हलियर दे ला लीजन डी’ऑनर (द लीजन ऑफ ऑनर The Legion Of Honor) मिळाला आहे. नेपोलियन बोनापार्टने (Nepolian Bonaparte) १८०२ मध्ये स्थापित केलेला ‘फ्रेंच ऑर्डर ऑफ मेरिट’ (French Order Of Merit) उत्कृष्ट नागरी किंवा लष्करी वर्तनासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. या सन्मानाच्या घोषणेनंतर ट्विटरवर थरूर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, थरूर यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.