हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची मुसंडी, भाजप पिछाडीवर

हिमाचल प्रदेशच्या विधानसभेची ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी येथे जाहीर सभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील येथे भाजपसाठी मते मागितली होती. काँग्रेसच्याही बड्या नेत्यांनी या राज्यात जोमात प्रचार केला होता. एक्झिट पोलनुसार येथे भाजपला २४ ते ३४ आणि काँग्रेसला ३० ते ४० जागा मिळण्याची शक्यता आहे.

    शिमला – हिमाचल प्रदेशच्या विधानसभा (Himachal Pradesh Election) निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. येथे विधानसभेच्या ६८ जागांसाठी ४१२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात ७५.६ टक्के मतदान झाले होते. या राज्यात प्रत्येक पाच वर्षांत सत्ताबदल होतो. आज मतमोजणी होत असून लवकरच येथे कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे.

    हिमाचल प्रदेशच्या विधानसभेची ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या (BJP) बड्या नेत्यांनी येथे जाहीर सभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीदेखील येथे भाजपसाठी मते मागितली होती. काँग्रेसच्याही (Congress) बड्या नेत्यांनी या राज्यात जोमात प्रचार केला होता. एक्झिट पोलनुसार (Exit Poll) येथे भाजपला २४ ते ३४ आणि काँग्रेसला ३० ते ४० जागा मिळण्याची शक्यता आहे.

    हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे. सध्या काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर असून भाजपची उमेदवार २९ जागांवर आघाडीवर आहेत. तर, तीन जागांवर अपक्ष आमदार सरस ठरत आहेत.