delhi tyre burning

राहुल गांधींची ईडी चौकशी सुरु असताना संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील ईडी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर टायर जाळले (Tires Burnt At Delhi) आहेत.

    नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald Case) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)ने (ED) मंगळवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची दहा तास चौकशी केली आहे. आज पुन्हा राहुल गांधी यांची चौकशी सुरु आहे. राहुल गांधींची ईडी चौकशी सुरु असताना संतापलेल्या काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी दिल्लीतील ईडी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर टायर जाळले (Tires Burnt At Delhi) आहेत. याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेसच्या काही नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

    काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गाँधी यांना समन्स जारी केला होता. दिल्ली ईडी कार्यालयात १३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते. दोन दिवस चौकशी केल्यानंतर आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. काल दहा तास चौकशी झाल्यानंतर आज पुन्हा चौकशीसाठी बोलवल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. यावेळी राहुल गांधी यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू असताना बाहेर टायर पेटवले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपस्थित पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.