mallikarjun kharge

'काँग्रेसने (Congress) संविधान आणि लोकशाहीचे (Democracy) रक्षण केले नसते तर नरेंद्र मोदी (Narendra Modi) कधीच पंतप्रधान झाले नसते, असे म्हटले आहे.

    नवी दिल्ली : ‘काँग्रेसने (Congress) संविधान आणि लोकशाहीचे (Democracy) रक्षण केले नसते तर नरेंद्र मोदी (Narendra Modi) कधीच पंतप्रधान झाले नसते, असे म्हटले आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) भारताला जोडण्याचे काम करतात तर पंतप्रधान ते तोडण्याचे काम करतात, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधानांवर टीका केली.

    महिला काँग्रेसच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्वतः पक्षप्रमुख होण्याबाबत मोठा खुलासा केला आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून मला अध्यक्षपद मिळाले, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. या विधानामुळे पक्षांतर्गत निवडणुकीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधत काँग्रेसने संविधान आणि लोकशाहीचे रक्षण केले नसते तर नरेंद्र मोदी कधीच पंतप्रधान झाले नसते, असे म्हटले आहे.

    पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत. महिलांनी निर्धार केला तर त्या भाजप सरकारला हटवू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत फक्त स्वतःबद्दल बोलतात. त्यांना गांधी, नेहरू, पटेल, आंबेडकर आठवत नाहीत. मणिपूर जळत आहे, पण पंतप्रधान तिकडे गेले नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.