after bihar election mallikarjun kharge attacks on congress leaders over crisis in party

देशाच्या अमृत काळातील अर्थसंकल्प मी सादर करते आहे असं भाषणाच्या सुरूवातीला निर्मला सीतारमण म्हणाल्या. अनेक घोषणा करत आजचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली आहे. गरीब जनतेला दिलासा देणारा हा अर्थसंकल्प नाही, अशी टीका काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी केली आहे.

    नवी दिल्ली: मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात गरीब जनतेसाठी काहीही तरतूद नाही. येत्या काळात ३ ते ४ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजचा अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर करण्यात आला आहे,अशी टीका काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी केली आहे. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात गरीब जनतेसाठी काहीही तरतूद करण्यात आलेली नाही असंही मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं आहे.

    मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा काही राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका समोर ठेवून सादर करण्यात आला आहे. गरीब लोकांसाठी या अर्थसंकल्पात कोणतीच तरतूद नाही. बेरोजगारांच्या समस्या कशा सोडवणार ? याचंही उत्तर देण्यात आलेले नाही. सरकारी नोकऱ्यांमध्ये जी पदं रिक्त आहेत ती कधी भरणार हे सांगितलेलं नाही. मनरेगाचं काय होणार? त्याबाबतही कुठलीच घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली नाही. महागाई खूप वाढली आहे. मात्र ती नियंत्रित करण्यासाठी कुठल्याही तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या नाहीत, असे खर्गे म्हणाले.


    आज मोदी सरकारच्या वतीने शेवटचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पुढच्या वर्षी२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक असल्याने अर्थसंकल्प सादर केला जाणार नाही. आपल्या देशाच्या अमृत काळातील अर्थसंकल्प मी सादर करते आहे असं भाषणाच्या सुरूवातीला निर्मला सीतारमण म्हणाल्या. अनेक घोषणा करत आजचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली आहे. गरीब जनतेला दिलासा देणारा हा अर्थसंकल्प नाही असं खर्गे यांनी म्हटलं आहे.

    दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे. सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.