काँग्रेसचे आज देशभर ‘संकल्प सत्याग्रह आंदोलन’; दिल्लीत काँग्रेसच्या राजघाटावरील आंदोलनाला पोलिसांनी नाकारली परवानगी, तर…

राहुल गांधी यांना सुरत येथील कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मानहानी प्रकरणात कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून, राहुल गांधी प्रकरणावर काँग्रेसचा संसद भवन ते विजय चौक असा मोर्चा काढला आहे. दरम्यान, आज देशभर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लोकसभेतून (Lok sabha) अपात्र ठरवत त्यांची खासदारकी (MP) रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते रविवारी नवी दिल्लीतील महात्मा गांधींच्या पुतळ्यांसमोर एकदिवसीय सत्याग्रह करणार आहेत. पक्षाच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधींच्या समर्थनार्थ देशभर सर्व प्रांत आणि जिल्ह्यांमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यांसमोर हा ‘संकल्प सत्याग्रह’ करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू होणार आहे. दिल्लीतील राजघाटावर आयोजित ‘संकल्प सत्याग्रहा’मध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा आणि इतर अनेक काँग्रेस नेते सहभागी होणार आहेत. परंतू या आंदोलनाला आता दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे.

शिक्षेनंतर खासदारकी रद्द…

केरळच्या वायनाड संसदीय जागेचे प्रतिनिधित्व करणारे राहुल गांधी यांना 2019 च्या मानहानीच्या खटल्यात सुरत न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी लोकसभेतून अपात्र ठरविण्यात आले. लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, त्यांचा अपात्रतेचा आदेश 23 मार्चपासून लागू होईल. सुरतमधील एका न्यायालयाने ‘मोदी आडनाव’ संदर्भातील टिप्पणीबाबत हा निर्णय दिला होता. तर दुसरीकडे आज राहुल गांधींविरोधात आज राज्यभर भाजपाकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

शिक्षेचे पडसाद सर्वंत्र…

२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कर्नाटकात मोदी (Modi) आडनावावर टीका करताना, वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर सुरत कोर्टानं (Surat court) राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. यावर देशभरात तीव्र पडसाद उमटताहेत. दरम्यान, याचे पडसाद अधिवेशनात देखील उमटले. सभागृहात विरोधक व सत्ताधारी आमनेसामने आले. व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तर दुसरीकडे सूरत कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेवरून काँग्रेस संसदेत आक्रमक झाल्याचे पाहला मिळाले. राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर केलेली टिप्पणी ही ओबीसी समाजाचा अपमान करणारी असून त्याविरोधात आंदोलन करण्याची घोषणा भाजपने केली आहे.

काँग्रेसकडून डरो मत आंदोलन

राहुल गांधी यांना सुरत येथील कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मानहानी प्रकरणात कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून, राहुल गांधी प्रकरणावर काँग्रेसचा संसद भवन ते विजय चौक असा मोर्चा काढला आहे. यात काँग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य सहभागी झाले होते. तसेच सोशल मीडियावरील सर्व प्रोफाईलवर ‘डरो मत’ असं लिहिण्यात असून, राहुल गांधींचा फोटो ठेवण्यात आला आहे.

भाजपाकडून राज्यभर आंदोलन…

सुरत कोर्टानं राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. यावर देशभरात तीव्र पडसाद उमटताहेत. दरम्यान, याचे पडसाद अधिवेशनात देखील उमटले. सभागृहात विरोधक व सत्ताधारी आमनेसामने आले. व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर केलेली टिप्पणी ही ओबीसी समाजाचा अपमान करणारी असून, त्याविरोधात आंदोलन करण्याची घोषणा भाजपने केली आहे. तसेच सावरकरांविषयी अपमानस्पद बोलल्यामुळं भाजपा आक्रमक झाली असून, राहुल गांधींच्या विरोधात भाजपाने आंदोलनाची हाक दिली आहे. राहुल गांधींनी माफी मागावी असं भाजपाने म्हटलं आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधींनी दोन वर्षापूर्वी मोदी आडनावावर वक्तव्य केले होते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या संदर्भात वक्तव्य केले होते. “सर्व चोरांची नावे मोदी कशी काय?,” असं म्हटल्यानंतर राहुल गांधींच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. यावर सुनावणी पार पडली असता, कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. याचे पडसाद विधानभवनात पाहयला मिळाले. याचे पडसाद देशभर पाहयला मिळत आहेत.