मतमोजणीपूर्वी EVMच्या सुरक्षेवर सवाल, हिमाचलमध्ये काँग्रेसचे स्ट्राँग-रूमबाहेर तंबू

काँग्रेस उपाध्यक्ष नरेश चौहान यांनी सांगितले की, पक्षाने धर्मपूर, किन्नौर, पांवटा साहब, घुमारवी, नाचन व गगरेटमध्ये तंबू टाकलेत. सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांनी शंका व्यक्त केल्यामुळे असे करण्यात आले आहे. रामपूरमध्य खासगी गाडीत ईव्हीएम आढळल्यामुळे हा संशय अधिक गडद झाला आहे.

    नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी EVM अर्थात मतदान यंत्राच्या सुरक्षेवर चर्चा रंगली आहे. काँग्रेसने अर्धा डझनहून अधिक विधानसभा क्षेत्रांत स्थापन करण्यात आलेल्या स्ट्राँग रूमबाहेर तंबू गाडलेत. काँग्रेस नेते २४ तास या स्ट्राँग रूमबाहेर डेरा टाकून ईव्हीएमची सुरक्षा करत आहेत.

    काँग्रेस उपाध्यक्ष नरेश चौहान यांनी सांगितले की, पक्षाने धर्मपूर, किन्नौर, पांवटा साहब, घुमारवी, नाचन व गगरेटमध्ये तंबू टाकलेत. सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांनी शंका व्यक्त केल्यामुळे असे करण्यात आले आहे. रामपूरमध्य खासगी गाडीत ईव्हीएम आढळल्यामुळे हा संशय अधिक गडद झाला आहे.

    पक्षाचे नेते २४ तास स्ट्राँग रूमची निगराणी करत आहेत. कोण स्ट्राँग रूममध्ये ये-जा करत आहे यावर करडी नजर ठेवली जात आहे. निवडणूक आयोगामुळे तंबू ठोकण्याची वेळ ओढावली आहे. आयोगाने या प्रकरणी सुरक्षेची कोणती व्यवस्था केली हे सांगावे, असे चौहान म्हणाले.

    थ्री-लेयर सुरक्षेचे दावे केले जात आहेत. पण ही सुरक्षा किती फुल-प्रुफ आहे हे आयोगाने सांगावे. देशातील अनेक राज्यांत ईव्हीएमविषयी वेळोवेळी चर्चा होते. यामुळेही संशयाला जागा आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकरणी लोकांचा विश्वास जिंकण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.