काँग्रेसचं टेन्शन वाढणार?, भाजपची निकालाआधीच नवी रणनिती; मास्टर प्लान तयार

राजस्थान वगळता अन्य चारही राज्यात भाजपाची पीछेहाट होईल, असा अंदाज विविध एक्झिट पोल एजन्सींनी वर्तवला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण असून भाजप नेत्यांना पराभवाची धास्ती आहे. हीच बाब लक्षात घेता भाजपने प्लान बी आखला आहे.

    नवी दिल्ली : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. या चारही राज्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. राजस्थान वगळता अन्य चारही राज्यात भाजपाची पीछेहाट होईल, असा अंदाज विविध एक्झिट पोल एजन्सींनी वर्तवला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण असून भाजप नेत्यांना पराभवाची धास्ती आहे. हीच बाब लक्षात घेता भाजपने प्लान बी आखला आहे.

    निवडणुकीत अटीतटीची लढत पाहता अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहे. भाजपच्या प्लानला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने देखील रणनिती आखली आहे. काँग्रेसने देखील काही अपक्ष आमदार आणि भाजपमधील नाराज आमदारांसोबत संपर्क साधल्याची माहिती आहे.

    राजस्थान विधानसभा निवडणुकीत आपल्याच पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील, असा भाजपला विश्वास आहे. त्यामुळे याठिकाणी काँग्रेसपासून सावध राहण्यासाठी भाजपने आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी हेलिकॉप्टर तयार ठेवले आहेत.