महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसचा आज पंतप्रधान निवासाला घेराव

काँग्रेस मुख्यालयात गुरुवारी रात्रीपासूनच काँग्रेस कार्यकर्ते जमू लागले आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. जंतर-मंतर वगळता, नवी दिल्ली जिल्ह्यातील संपूर्ण भागात जमावबंदी लागू आहे. राहुल गांधी म्हणाले की, लोकशाहीत आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे. पोलीस परवानगी देत ​​नाहीत, ठीक आहे, रोखून दाखवा, असे आव्हान दिले आहे.

    नवी दिल्ली : काँग्रेसच्या (Congress) वतीने आज महागाई (Inflation) आणि बेरोजगारीविरोधात (Unemployment) देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. इतकेच नाही तर काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दिल्लीतील निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald) ईडी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चौकशी करत आहे. तर, या मुद्द्यावरुन संसदेत सरकारला घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

    काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी, ‘मी मोदींना अजिबात घाबरत नाही. सत्य दडपता येत नाही. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, पण सत्याला आळा घालता येत नाही,’ असे म्हटले आहे. काँग्रेस मुख्यालयात गुरुवारी रात्रीपासूनच काँग्रेस कार्यकर्ते जमू लागले आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. जंतर-मंतर वगळता, नवी दिल्ली जिल्ह्यातील संपूर्ण भागात जमावबंदी लागू आहे. दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्याने राहुल गांधी म्हणाले की, लोकशाहीत आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे. पोलीस परवानगी देत ​​नाहीत, ठीक आहे, रोखून दाखवा, असे आव्हान दिले आहे.

    काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लादल्याविरोधात काँग्रेस दिल्लीत निदर्शने करणार आहे. याशिवाय राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणार असून पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव देणार आहोत. काँग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभा खासदार संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणार आहेत.