राजस्थानमध्ये काँग्रेसची बाजी; ४ पैकी ३ जागांवर विजयी

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.

    राजस्थान – राजस्थानमध्ये काँग्रसने दणदणीत विजय मिळवला आहे. राजस्थान राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने 4 पैकी 3 जागांवर विजय मिळवला आहे. तर, भाजपला एकाच जागेवर आपले समाधान मानावे लागले आहे.

    राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. भाजपाचे धनश्याम तिवारी विजयी झाले असून, अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांचा पराभव झाला आहे.