अडीच वर्षांपासून सरकार योग्यरित्या चालत असल्याने षडयंत्र, मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी शिवसेनेकडे – शरद पवार

राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान दिल्लीत शरद पवार व देवेंद्र फडणवीस (Sharad Pawar and Devendra fadnvis) हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद (Sharad Pawar Press conference) घेत या सर्व प्रकारावर भाष्य केलं आहे. अडीच वर्षांपासून सरकार योग्यरित्या चालत असल्याने षडयंत्र रचलं असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकार (MVA) बनवण्यापूर्वी देखील अशीच बंडाळी राज्यात होती असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

    नवी दिल्ली : सोमवारी विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) पार पडली. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार (MLC Election 10 seat) रिंगणात उतरले होते. भाजपा व मविआ (BJP and MVA) या दोघांमध्ये अंत्यत चुरशीची लढत पाहायला मिळाली. दरम्यान, भाजपाचे पाचपैकी पाचही उमेदवार जिंकून आले आहेत. तर मविआचे सहापैकी पाच उमेदवार जिंकले असून, एक उमेदवार म्हणजे चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीत मविआच्या पराभवानंतर आता ठाकरे सरकारला धक्के बसायला सुरुवात झाली आहे. तसेच मविआमध्ये चलबिचलता तसेच सरकार अस्थिर होण्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या १३ समर्थक आमदारांसह (13 MLA)  नॉट रिचेबल आहेत. शिंदे हे गुजरातमधील सुरत (Gujrat surat) येथे एका हॉटेलमध्ये आहेत. या सर्व पाशर्वभूमीवर शिवसेनेतून १३ पेक्षा जास्त आमदार फुटू शकतात. व ते भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देऊ शकतात असं बोललं जात आहे. त्यामुळं राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, दिल्लीत शरद पवार व देवेंद्र फडणवीस (Sharad Pawar and Devendra fadnvis) हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद (Sharad Pawar Press conference) घेत या सर्व प्रकारावर भाष्य केलं आहे.

    अडीच वर्षांपासून सरकार योग्यरित्या चालत असल्याने षडयंत्र रचलं असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकार (MVA) बनवण्यापूर्वी देखील अशीच बंडाळी राज्यात होती असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदेंची (Eknath shinde) मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे की, नाही माहित नाही. मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी शिवसेनेकडे आहे असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. या सर्व राजकीय पेचातून मार्ग निघेल असा विश्वास सुद्धा शरद पवारांनी व्यक्त केला आहे.