पंतप्रधान आवास योजनेतून 3 कोटी घरांची निर्मिती; केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती

पंतप्रधान आवास योजनेतून 3 कोटी घरे बनवली. मत्स निर्यातील सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यात पंतप्रधान आवास योजनेतून 3 कोटी घरे बनवण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री दिली. तसेच येत्या पाच वर्षात दोन कोटी घरे बांधण्यात येणार आहेत.

    नवी दिल्ली : पंतप्रधान आवास योजनेतून 3 कोटी घरांची निर्मिती करण्यात आली. मत्स निर्यातीला सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यात पंतप्रधान आवास योजनेतून 3 कोटी घरे बनवण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री दिली. तसेच येत्या पाच वर्षांत दोन कोटी घरे बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने या अंतरिम बजेटमध्ये रेल्वेसाठी मोठी आर्थिक तरतूद होईल. 2024-25 मध्ये रेल्वेसाठी 3 लाख कोटींपेक्षा जास्त निधी मिळण्याची अपेक्षा आहे. हा निधी मागील अर्थसंकल्पापेक्षा 25 टक्क्यांनी जास्त असेल.

    रेल्वेसाठी 1.40 लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती, त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजेच 2023-24 च्या अर्थसंकल्पात हाच आकडा 2.40 लाख कोटींवर गेला होता. आता यामध्येही आणखी वाढ होऊन यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी तसेच नवनवीन सुविधा अमलात आणण्यासाठी केंद्र सरकार 3 लाख कोटींपेक्षा जास्त रकमेची घोषणा करू शकते.