‘कंगनाच्या गालापेक्षाही गुळगुळीत रस्ते बांधू’ काँग्रेस आमदाराचं वादग्रस्त विधान

जामताराचे आमदार इरफान अन्सारी यांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये कंगनाच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते राज्यातील आदिवासी समाजातील मुले आणि तरुण वापरतील. अशा १४ जागतिक दर्जाच्या रस्त्यांच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार अन्सारी म्हणाले की, ‘जामताऱ्यात असे रस्ते बांधले जातील, ज्यामध्ये लोकांना ना धूळीचा सामना करावा लागणार, ना खड्ड्यांना सामोरे जावे लागेल. आदिवासी मुले आणि व्यापारी वर्गाला याचा मोठा फायदा होईल.’ असे त्यांनी म्हटले आहे.

    झारखंड : जामतारा येथील काँग्रेसचे आमदार डॉक्टर इरफान अन्सारी यांनी अभिनेत्री कंगना राणौतबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कंगना राणौतच्या गालापेक्षाही जामताऱ्याचे रस्ते गुळगुळीत होतील, असे त्यांनी म्हटलं आहे. त्यांचा एक व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिध्द केला असून त्यात ते बोलत आहेत.

    जामताराचे आमदार इरफान अन्सारी यांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये कंगनाच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते राज्यातील आदिवासी समाजातील मुले आणि तरुण वापरतील. अशा १४ जागतिक दर्जाच्या रस्त्यांच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    आमदार अन्सारी म्हणाले की, ‘जामताऱ्यात असे रस्ते बांधले जातील, ज्यामध्ये लोकांना ना धूळीचा सामना करावा लागणार, ना खड्ड्यांना सामोरे जावे लागेल. आदिवासी मुले आणि व्यापारी वर्गाला याचा मोठा फायदा होईल.’ असे त्यांनी म्हटले आहे.

    त्यांच्या या विधानाचा एक व्हिडिओ सध्य़ा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यामुळे आता कंगनाकडून काय प्रतीउत्तर येते हे लवकरच समजणार आहे. आमदार इरफान यांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी टीका करत त्यांचा निषेध केला आहे.