‘छत्रपतींचा अवमान ही छोटी गोष्ट’ कर्नाटच्या मुंख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवर धक्कादायक विधान केलंय. विटंबना ही छोटी गोष्ट आहे, असं विधान बोम्मई यांनी केल्यानं आता शिवप्रेमी अधिकच संपातले आहेत. महाराष्ट्रभरातून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे.

  बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अवमानप्रकरणी बेळगावात शनिवारी सकाळपासून जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री शहरात ठिकठिकाणी दगडफेकप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले असून २७ जणांना अटक केली. या प्रकरणाचे राज्यातही ठिकठिकाणी पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले.

  कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवर धक्कादायक विधान केलंय. विटंबना ही छोटी गोष्ट आहे, असं विधान बोम्मई यांनी केल्यानं आता शिवप्रेमी अधिकच संपातले आहेत. महाराष्ट्रभरातून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे.

  बंगळुरू येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. शुक्रवारी रात्री याचे पडसाद बेळगावात उमटले. रात्री दहाच्या सुमारास शेकडो युवकांनी धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन केले. या वेळी काही वाहनांवर दगडफेक झाली. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी शनिवारी सकाळी आठ वाजेपासून रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपूर्ण शहरात जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

  काय म्हटलंय मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी?

  रातोरात महाराष्ट्र एकीकरण समितीनं जे केलं, त्याचा आम्ही निषेध करतो. कुणीही कायद्याविरोधात गेलं, तर कारवाई ही होणारचं. गृहमंत्र्यांना तसे कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. छोट्या-मोठ्या घटनेसाठी सावर्जनिक मालमत्तेचं नुकसान सहन केलं जाणार नाही.

  दोषींवर कारवायी करण्याची खासदार संभाजीराजेंची मागणी

  देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा बंगळुरू येथे झालेला अवमान निषेधार्ह आहे. बंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी या वेळी केली.