प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

विश्व संवाद केंद्रात चर्चेदरम्यान विहिंपचे केंद्रीय महामंत्री परांडे यांनी मध्यप्रदेशात धर्म स्वातंत्र्य कायदा अधिनियम २०२१ लागू करण्यात आला आहे. या कायद्याच्या मदतीने समाजात होणाऱ्या धर्मविरोधी हालचालींना रोखण्यास मदत मिळणार आहे, तसेच विहिंप याविषयी जागरूकता आणण्याचे काम करणार असल्याचे सांगितले.

    नवराष्ट्र न्यूज नेटवर्क , भोपाळ.

    मध्य प्रदेशाच्या सीमेलगतच्या जिल्ह्यात धार-झाबुआमध्ये विश्व हिंदू परिषद ५६ ख्रिश्चन धर्मगुरूंच्या नावांची यादी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे. विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी सांगितले की, राजस्थान व गुजरात नजीकच्या सीमावर्ती जिल्हे धार-झाबुआमध्ये ख्रिश्चन मिशनरी खोटे बोलून व लालूच दाखवून आदिवासी लोकांचे मतपरिवर्तन करीत आहे. हे योग्य नाही. त्यामुळे या प्रकरणी योग्य करवाई करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

    विश्व संवाद केंद्रात चर्चेदरम्यान विहिंपचे केंद्रीय महामंत्री परांडे यांनी मध्यप्रदेशात धर्म स्वातंत्र्य कायदा अधिनियम २०२१ लागू करण्यात आला आहे. या कायद्याच्या मदतीने समाजात होणाऱ्या धर्मविरोधी हालचालींना रोखण्यास मदत मिळणार आहे, तसेच विहिंप याविषयी जागरूकता आणण्याचे काम करणार असल्याचे सांगितले. तसेच परांडे यांनी धर्म स्वातंत्र्य कायद्यासाठी सरकारचे अभिनंदनही केले आहे.