Corona's havoc in the district! On the same day, 83 new patients, the number of active patients reached half a dozen

देशात कोरानाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने घट होत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे केवळ 347 नवीन रुग्ण आढळले आहेत.

    नवी दिल्ली : दिवसेंदिवस देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. कमी होणारी ही रुग्णसंख्या नागरिकांना दिलासा देणारी आहे. गेल्या 24 तासात देशात केवळ 347 नव्या कोरोना रुग्णांची  नोंद करण्यात आली आहे. तर, गेल्या 24 तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाला.

    देशात कोरानाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने घट होत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे केवळ 347 नवीन रुग्ण आढळले आहेत. या रुग्णसंख्येसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 5,516 वर आली आहे. तर गेल्या 24 तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून दिल्ली, गुजरात आणि कर्नाटकमधील रुग्णांचा समावेश आहे. देशातील एकूण मृतांचा आकडा 5,30,604 वर गेला आहे. तर, आतापर्यंत 4,41,34,710 लोक कोरोनातुन बरे   झाले आहेत.

    देशातील कालची कोरोना रुग्णांची संख्या पाहता आजची ही वाढ कालच्या तुलनेत कमी होती. गुरुवारी देशात कोरोना संसर्गाचे 408 नवीन रुग्ण आढळले होते. तर पाच जणांचा मृत्यू झाला होता. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत कोविड-19 विरोधी लसींचे 219.89 डोस देण्यात आले आहेत.