
सध्या स्थितीत भारतातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 53,637 वर पोहोचली आहे.
गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या रुग्णात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज होणारी ही रुग्णवाढ चिंत वाढवणारी आहे. आता गेल्या भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8822 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
India witnesses new high in daily COVID tally with 8,822 fresh infections
Read @ANI Story | https://t.co/7Nu8jqanFL#India #COVID19 pic.twitter.com/pQ0b2Px86s
— ANI Digital (@ani_digital) June 15, 2022
महाराष्ट्रात राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मंगळवारी राज्यात 2956 रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील 1724 रुग्ण हे मुंबईतील आहे आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सोमवारी दिवसभरात 6594 रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासांत 4035 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 50 हजार 548 पर्यंत पोहोचली आहे. मंगळवारी दैनंदिन सकारात्मकता दर मागील दिवसाच्या तुलनेत 2.05 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.