कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतीये; गुजरातमध्ये गेल्या 24 तासांत…

भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले होते. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोना व्हायरस डोके वर काढू पाहत आहे. गुजरातमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले होते. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोना व्हायरस डोके वर काढू पाहत आहे. गुजरातमध्ये कोरोनाचा (Gujrat Coronavirus) संसर्ग वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. अहमदाबादमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये गेल्या 24 तासांत 90 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता गुजरात राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 300 च्या पुढे गेली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गुजरात सरकारकडून विशेष पावले उचलली जात आहेत. आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. रुग्णांचा रिपोर्ट स्वत: राज्याचे आरोग्यमंत्री हृषिकेश पटेल घेत आहेत. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यानंतर H3N2 विषाणूचा संसर्गही होत आहे. दोन दिवसांपूर्वी वडोदरा येथे एका महिलेचा मृत्यू झाला होता. पण हा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती समोर आली नाही. याबाबतचा अंतिम अहवाल येणे बाकी असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यानंतरच मृत्यू कशामुळे झाला याची माहिती मिळू शकले.

गुजरातमध्ये 300 ऍक्टिव्ह रूग्ण

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या कोरोनाचा इतका संसर्ग वाढत आहे की नवीन रुग्णांमध्ये 55 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 25 टक्क्यांनी वाढली आहे. गुजरातमध्ये गेल्या 24 तासांत 90 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सर्वाधिक 49 रुग्ण अहमदाबाद शहरात आढळले आहेत. मेहसाणामध्ये 10, राजकोट शहरात 8, सुरत शहरात 6 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.