coronavirus outbreak india cases news and updates 31 december 2020 nrvb

दिल्लीत संचारबंदी (Curfew) आज रात्री ११ वाजल्यापासून ते १ जानेवारी सकाळी ६ वाजेपर्यंत आणि १ जानेवारीच्या रात्रीपासून ते २ जानेवारी सकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

दिल्लीत नव्या वर्षाच्या स्वागताला कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्याने दोन दिवस रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आह. या दरम्यान सार्वजनिक ठिकाणी पाचहून अधिक जणांना एकत्र येता नाही. नवीन वर्षाचा उत्सव साजरा होणार नाही. हे निर्बंध आज रात्री ११ वाजल्यापासून ते १ जानेवारी सकाळी ६ वाजेपर्यंत आणि १ जानेवारी रात्री ११ वाजल्यापासून ते २ जानेवारी सकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहतील. तर, गोव्यात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जवळपास ४५ लाख लोकं दाखल झाली आहेत.

देशात गेल्या २४ तासांत २१ हजार ९४४ नवीन रुग्ण आढळले असून २६ हजार ४०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. २९९ संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे ॲक्टिव्ह केसेस म्हणजेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ४७७६ आहे. आतापर्यंत एकूण १.०२ कोटी रुग्ण संख्या झाली आहे. यात ९८.५९ लाख रुग्ण बरे झाले आहेत. १.४८ लाख लोकांनी या महामारीत आपले प्राण गमावले आहेत. ही आकडेवारी covid19india.org येथून घेण्यात आली आहे.

कोरोना अपडेट्स

AIIMS दिल्लीचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी कोरोना परिस्थितीबाबत बुधवारी पत्रकार परिषद घेतली. ब्रिटनमध्ये नव्याने सापडलेला कोरोनाचा विषाणू भारतात नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीलाच दाखल झाला असण्याची शक्यता आहे असं गुलेरिया म्हणाले. हा वेगाने पसरतो आहे, तथापि भारतात गेल्या काही आठवड्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली नाही पण, त्यांना अधिक सतर्क राहण्यास सांगण्यात आलं असल्याची माहितीही गुलेरिया यांनी दिली आहे.

पंजाब सरकारने राज्यात १ जानेवारीपासून रात्रीची संचारबंदी हटविण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात मोठा दिलासा हॉटेल, रेस्टॉरंटला मिळाला आहे. आता आत २०० तर बाहेर ५०० लोकं एकत्र जमू शकतात. तथापि, ३१ डिसेंबरपर्यंत हे निर्बंध पूर्वीसारखेच असणार आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांनी बुधवारी सांगितले की, राज्यात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ४०-४५ लाख पर्यटक दाखल झाले आहेत. आम्ही कोरोनाची सर्व मार्गदर्शक तत्त्वेही लागू केली आहेत जेणेकरून लोकांनी याचं महत्त्व समजून घेऊन जागरुक रहावे.

ओडिसा सरकारने कोरोनाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ही १ ते ३१ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहेत. या दरम्यान सिनेमाहॉल आणि थिएटर ५० टक्के क्षमतेनेच उघडण्याची परवानगी असणार आहे. सामाजिक, धार्मिक, मनोरंजन, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अधिकाधिक २०० लोकांना सहभागी होता येणार आहे.

कर्नाटकातल्या बेंगळुरुमध्ये नव्या वर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबर दुपारी १२ वाजल्यापासून १ जानेवारी सकाळी ६ वाजेपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

५ राज्यांची स्थिती

१. दिल्ली

येथे मंगळवारी ६७७ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. ९४० जण बरे झाले आणि २१ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत संक्रमणाच्या ६.२४ लाख केसेस आढळल्या आहेत. यात ६.०८ लाख रुग्ण बरे झाले आहेत. १० हजार ५२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे असून ५ हजार ८३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

२. मध्यप्रदेश

येथे गेल्या २४ तासांत ८६५ नवीन संक्रमित आढळले आहेत. १०६० रुग्ण बरे झाले आहेत आणि १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. येथे आजवर कोरोना संक्रमणाच्या २.४० लाख प्रकरणे आढळली आहेत. यात २.२७ लाख रुग्ण बरे झाले आहेत आणि ३५९५ जणांचा मृत्यू झाला आहे. आता ९३८७ संक्रमितांवर उपचार सुरू आहेत.

३. गुजरात

येथे बुधवारी ७९९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. ८३४ जण बरे झाले आणि ७ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत २.४४ लाख केसेस आल्या आहेत. यापैकी २.३० लाख रुग्ण बरे झाले आहेत. ४३०२ लोकांनी आपले प्राण गमावले असून ९८७९ जणांवर उपचार सुरू आहेत.

४. राजस्थान

येथे गेल्या २४ तासांत ७७० कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. ११४२ रुग्ण बरे झाले. ६ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ३.०७ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात २.९५ लाख जण बरेही झाले आहेत. २६८९ जणांचा मृत्यू झाला आहे तर, ९ हजार ८३५ रुग्ण उपचार घेत आहेत.

५. महाराष्ट्र

महाराष्ट्रात बुधवारी ३५३७ जणांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. ४९१३ जण बरे झाले आणि ९० जणांचा मृत्यू झाला. आजवर १९.२८ लाख लोकांना बाधा झाली आहे. यात १८.२४ लाख जण बरेही झाले. ४९ हजार ४६३ जणांचा मृत्यू झाला, तर ५३ हजार ६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.