‘राहुल गांधी हाजिर हो…’; ‘या’ प्रकरणी १ नोव्हेंबरला होणार सुनावणी

काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात लखनौमध्ये दाखल गुन्ह्याच्या प्रकरणातील याचिका जिल्हा व सत्र न्यायाधीश अश्विनी कुमार त्रिपाठी यांनी स्वीकारली. त्यांनी केरळमधील वायनाडचे खासदार असलेले राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे.

    लखनौ : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात लखनौमध्ये दाखल गुन्ह्याच्या प्रकरणातील याचिका जिल्हा व सत्र न्यायाधीश अश्विनी कुमार त्रिपाठी यांनी स्वीकारली. त्यांनी केरळमधील वायनाडचे खासदार असलेले राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. हे प्रकरण एमएलए न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयात स्थानांतरित करण्यात आले आहे.

    या प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल फौजदारी खटला रद्द करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधात जिल्हा व सत्र न्यायाधीश अश्विनी कुमार त्रिपाठी यांच्या कोर्टात दाद मागण्यात आली.

    स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्य

    तक्रारकर्ते नृपेंद्र पांडे यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप करत मुख्य न्यायदंडाधिकारी तृतीय यांच्याकडे एक तक्रार दाखल केली होती. यामध्ये विरोधकांकडून ‘भारत जोडो’ यात्रेत विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे म्हटले होते. राहुल यांनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील अकोला येथे जाणीवपूर्वक सावरकरांविरोधात भाष्य केल्याचा आरोप करण्यात आला होता.