धार्मिक चिन्ह असलेली शाल पांघरली ; नवज्योत सिद्धूंनी मागितली माफी

चंदीगड :  धार्मिक चिन्हे असलेली शाल घालून शीख समुदायाच्या भावना दुखावल्या प्रकरणी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिलगिरी व्यक्त केली. या आचरणासंदर्भात निर्माण झालेल्या वादानंतर अकाल तख्त जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी सिद्धू यांना माफी मागण्याचा सल्ला दिला होता.

चंदीगड :  धार्मिक चिन्हे असलेली शाल घालून शीख समुदायाच्या भावना दुखावल्या प्रकरणी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिलगिरी व्यक्त केली. या आचरणासंदर्भात निर्माण झालेल्या वादानंतर अकाल तख्त जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी सिद्धू यांना माफी मागण्याचा सल्ला दिला होता. सिद्धू म्हणाले की, श्री अकाल तख्त साहिब सर्वोच्च आहेत. नकळत, माझ्या वागणुकीमुळे कोणाच्याही भावना दुखावण्यात आल्या असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो असे ते म्हणाले. लाखो लोक त्यांच्या पगडीवर किंवा कपड्यांवर शीख धर्माची प्रतीके वापरतात. अगदी अभिमानाने टॅटूही बनवितात. एक आदर्श शीख म्हणून मीही शाल ओढली परंतु अनावधानाने चूक घडली असे त्यांनी म्हटले.