गेल्या दोन आठवड्यांत देशातील कोरोना रुग्णात 3.5 पटीने वाढ! दिल्लीसह पुणे सांगलीतील ‘टीपीआरनं’ वाढवली चिंता

दिल्लीचे चार जिल्हे सर्वाधिक साप्ताहिक टीपीआर नोंदविणाऱ्यांच्या यादीत होते -

नवी दिल्ली: देशात कोविड-19 संसर्गाचा वेगान  प्रसार होत आहे. ताज्या माहितीनुसार, देशातील 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये साप्ताहिक चाचणी सकारात्मकता दर (TPR) 10% किंवा त्याहून अधिक असलेल्या जिल्ह्यांची संख्या 32 झाली आहे. तर, गेल्या दोन आठवड्यात देशातील कोरोना रुग्णात 3.5 पटीने वाढ झाली आहे. ही वाढ आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी ठरत आहे. 

टीपीआर ही कोविडसाठी सकारात्मक चाचणी केलेल्या एकूण नमुन्यांची टक्केवारी आहे. दोन आठवड्यांपूर्वी, पाच राज्यांमधील नऊ जिल्ह्यांमध्ये किमान 10% टीपीआर नोंदवला गेला होता, जो सर्वाधीत ठरला आहे. मार्च 19-25 या काळात TPR 5-10% होता, दोन आठवड्यांपूर्वी 15 (आठ राज्यांमध्ये) होता.

सर्वाधिक साप्ताहिक टीपीआर या जिल्ह्यांचा

दिल्लीचे चार जिल्हे सर्वाधिक साप्ताहिक टीपीआर नोंदविणाऱ्यांच्या यादीत होते – दक्षिण (13.8%), पूर्व (13.1%), उत्तर-पूर्व (12.3%) आणि मध्य (10.4%). इतरांमध्ये केरळमधील वायनाड (14.8%) आणि कोट्टायम (10.5%), गुजरातमधील अहमदाबाद (10.7%) आणि महाराष्ट्रात सांगली (14.6%) आणि पुणे (11.1%) यांचा समावेश आहे.