24 डिसेंबरपासून प्रवाशांची कोविड रॅन्डम चाचणी; केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी जारी केले मार्गदर्शक तत्वे

    दोन ते तीन दिवसापासून चीन देशाची स्थिती ही कोरोनामुळ अंत्यत चिंताजनक आहे. तसेच चीनसह इतर देशांमध्ये कोरोनाची  वाढती प्रकरणे पाहता केंद्र सरकारने पावल उचली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय प्रवासाच्या ७२ तास आधी केलेल्या RT-PCR चाचणीची माहिती भरण्याशी संबंधित हवाई सुविधा फॉर्म पुन्हा अनिवार्य करण्याची तयारी करत आहे. हे नियम चीन आणि इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांना लागू होतील. फॉर्ममध्ये कोरोना चाचणी अहवालासोबत संपूर्ण लसीकरण पुराव्याची माहितीही भरावी लागणार आहे.

    24 डिसेंबरपासून प्रत्येक आंतरराष्ट्रीय विमानाने येणाऱ्या काही प्रवाशांसाठी कोविडची चाचणी केली जाईल. सरकारच्या फ्लाइटमधील एकूण प्रवाशांपैकी 2% प्रवाशांनी आगमनानंतर विमानतळावर कोविड चाचणी करणे सुनिश्चित केले जाईल. अशा प्रवाशांची एअरलाइनद्वारे ओळख पटवली जाईल. नमुना दिल्यानंतर प्रवाशांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल. पॉझिटिव्ह आलेले नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जातील.


    चीन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये अचानक झालेली वाढ पाहता देशातील कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आता चीन आणि इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवासाच्या ७२ तास अगोदर केलेल्या RT-PCR चाचणीचा तपशील किंवा संपूर्ण लसीकरणाचा पुरावा देण्यासाठी आरोग्य मंत्रालय हवाई सुविधा फॉर्म पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. काही आठवडे परिस्थितीवर लक्ष ठेवून निर्णय घेतला जाईल.

    तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं की, कोरोना अजून संपलेला नाही. मी सर्व संबंधितांना सतर्क राहण्यास आणि दक्षता वाढविण्यास सांगितले आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत. आम्ही साथीच्या रोगाचा सामना करण्याचा निर्धार केला आहे आणि योग्य पावले उचलत आहोत.