
उन्हाळ्यात गायीच्या शेणापासून तयार केलेल्या टाईल्सला सध्या मोठी मागणी आहे.
पशुपालन करणारे नागरिक आतापर्यंत ते दूध, दही, ताक आणि पनीर विकून पैसे कमवत होते. मात्र आता शेणापासून ते चांगली कमाई करू शकतात. शेणाच्या टाईल्सचा (Cow Dung Tiles) नवा व्यवसाय सध्या सुरु करण्यात आला आहे. या व्यवसायात खूप पैसे खर्च करावे लागणार नाही. शिवाय कमी खर्चात जास्त नफा मिळेल. छत्तीसगडच्या (Chhatisgarh) महिला शेणापासून टाईल्स तयार करून चांगला नफा मिळवत आहेत. उन्हाळ्यात गायीच्या शेणापासून तयार केलेल्या टाईल्सला सध्या मोठी मागणी आहे. तुम्हाला जे वाचून आश्चर्य वाटेल पण घरी शेणाची टाईल्स लावून खोलीचे तापमान 7 ते 8 डिग्री कमी करता येतं. गाव असो की, शहर शेणापासून तयार केलेल्या टाईल्सची मागणी खूप वाढली आहे. अनेक पर्यटन स्थळांच्या जागी आणि फार्म हाऊसमध्ये शेणाच्या टाईल्स लावल्या जात आहेत. एक दिवस थांबण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. (Cow Dung Tiles Business)
कशा बनवल्या जातात शेणापासून टाईल्स ?
तुम्ही शेणापासून टाईल्स सुरू करू इच्छित असाल तर काही आवश्यक साहित्य तुम्हाला खरेदी करावे लागेल. त्यात शेण, चुण्याचे मिश्रण, जिप्सम, टाईल्स तयार करण्याचा साचा आणि मिश्रणासाठी मशीन लागेल. टाईल्स बनवण्यापू्र्वी शेणाला वाळवणं आवश्यक आहे. त्यानंतर मशीनमध्ये त्याचा चुरा बनवा. जिप्सम आणि चुन्याचं मिश्रण तयार करा. मिश्रणाला चुऱ्यासोबत मिळवून साच्यात टाका. वेगवेगळ्या आकाराच्या टाईल्स बनवा आणि टाईल्सला चांगल्या पद्धतीने उन्हात वाळवा.
पाणी, आगीचा टाईल्सवर परिणाम नाही
टाईल्स उन्हात वाळवल्या जातात. त्या मजबूत करण्यासाठी पाण्यात भिजवून ठेवावे लागते. त्यानंतर पुन्हा उन्हात वाळवावं लागतं. त्यानंतर ही टाईल्स तयार होते. या टाईल्स खूप हलक्या असतात. त्यावर पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. तसेच यावर आगीचाही या टाईल्सवर कोणताही परिणाम होत नाही. तीन-चार लाख रुपये खर्च करून हा व्यवसाय सुरू करता येणं शक्य आहे. शेणाच्या टाईल्सचा व्यवसाय करून तुम्ही काही महिन्यांत तुमचं उत्पन्न दुप्पट करू शकता. फक्त थोडी मेहनत घ्यावी लागेल.