‘गाय जनावर नाही, आई आहे’, गुजरातच्या कोर्टानं व्यक्त केलं मत, गोहत्या बंद झाल्या तर पृथ्वीवरील सर्व समस्या संपतील, काय दावा ?

तापी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस व्ही व्यास यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर गो तस्करी प्रकरणात सुनावणी सुरु होती. ऑगस्ट २०२२ मध्ये १६ गायींची तस्करी केल्याचा आरोप आमीन आरिफ अंजुम याच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणात त्याला अटकही करण्यात आली होती.

  अहमदाबाद : गाय (Cow) ही केवळ एक जनावर (Not Only Animal) नसून आई (Mother) आहे, असा दावा (Claim) चक्क गुजरातच्या एका कोर्टानं केलाय (One Of The Gujarat Court). गोहत्या बंद झाल्या (Cow Slaughter Stopped) तर पृथ्वीतलावरील सर्व समस्या संपतील, असा दावाही कोर्टाकडून करण्यात आला. जर गाय दु:खी झाली तर मानवाकडील धन आणि संपत्ती नष्ट होईल, असे मतही मांडण्यात आले (It was also believed that if a cow becomes sad, the wealth and wealth of a human being will be lost).

  गाईच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या घरांवर ॲटोमिक रेडिएशनचा (Atomic Radiation) परिणाम होत नाही. तर गोमूत्राचा वापर केल्याने अनेक असाध्य रोग बरे होतात. गो तस्करीच्या (Cow Smuggling) प्रकरणात सुनावणी करताना तापी जिल्हा कोर्टानं (Tapi District Court) ही टिप्पणी केलीय.

  गो तस्करीच्या प्रकरणात सुरु होती सुनावणी

  तापी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस व्ही व्यास यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर गो तस्करी प्रकरणात सुनावणी सुरु होती. ऑगस्ट २०२२ मध्ये १६ गायींची तस्करी केल्याचा आरोप आमीन आरिफ अंजुम याच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणात त्याला अटकही करण्यात आली होती. कोर्टानं या प्रकरणात त्याला आजीवन कारावास आणि ५ लाखांचा दंड ठोठावला आहे.

  गाय दु:खी झाली तर धन-संपत्ती नष्ट होईल

  या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायाधीश एसव्ही व्यास म्हणाले की, गाय केवळ जनावर नाही, तर आई आहे. गाईच्या पोटात ३३ कोटी देव असल्याचे मानण्यात येते. जर गाय दु:खी झाली तर आपल्याकडील धन-संपत्ती नष्ट होईल.

  जगाच्या पर्यावरणाच्या समस्येशीही त्यांनी गायीला जोडले. जर गोहत्या थांबल्या तर जगाच्या सर्व समस्या संपतील असा दावाही त्यांच्याकडून करण्यात आलाय. जोपर्यंत गोहत्या थांबत नाहीत तोपर्यंत जलवायू परिवर्तनाची समस्या संपणार नाही असेही ते म्हणाले.