प. बंगालमध्ये मोचा चक्रीवादळाचा धोका वाढला, 50 किमी वेगानं वाहणार वादळी वारे, देशातील हवामानात बदल, उत्तराखंडमध्ये हिमनद तुटला

बंगालच्या खाडीत 9 मे पर्यंत मोचा चक्रीवादळ (Cyclone Mocha) सक्रिय राहिल, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हे चक्रीवादळ उत्तरेकडे बंगालच्या मध्य खाडीच्या दिशेने सरकत असल्याची माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा (Mrityunjay Mahapatra) यांनी दिली आहे.

    कोलकाता : बंगालच्या खाडीत 9 मे पर्यंत मोचा चक्रीवादळ (Cyclone Mocha) सक्रिय राहिल, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हे चक्रीवादळ उत्तरेकडे बंगालच्या मध्य खाडीच्या दिशेने सरकत असल्याची माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा (Mrityunjay Mahapatra) यांनी दिली आहे.

    6 मे रोजी बंगालच्या खाडीत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होईल. या चक्रीवादळात सुरुवातीच्या काळात 40 ते 50 किमी प्रति तासाच्या वेगानं वादली वारे पाहतील असंही सांगण्यात आलंय. या चक्रीवादळाचं वान मोचा असं देण्यात आलेलं आहे. हे नाव येमेनमध्ये असलेल्या रेड सीच्या एका पोर्ट सीटीच्या नावावरुन ठेवण्यात आलेलं आहे.

    उत्तराखंडमध्ये हिमनद कोसळला, केदारनाथकडे जाणारा पायी रस्ता बंद

    या चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण देशावर किंवा देशातील काही भागात होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर या राज्यांत काही भागात पाऊस तर काही ठिकाणी बर्फवृष्टी झाली आहे. उत्तराखंडमध्ये केदारनाथकडे पायी जाणाऱ्या रस्त्यावर हीमनद कोसळला आहे. त्यामुळे भैरव गदेरा ते कुबेर गदेरा या भागातील रस्ता अनिश्चित काळापर्यंत बंद करण्यात आलेला आहे. बद्रीनाथसह चार धाम यात्रा करणाऱ्या भाविकांना एकाच ठिकाणी राहण्याची सूचना करण्यात आलेली आहे.