da hike

गेल्यावेळी सरकारने मार्चमध्ये DA वाढवला होता. तो १ जानेवारी २०२२ पासून लागू झाला. मार्चमध्ये, सरकारने डीएमध्ये ३% वाढ केली होती. म्हणजेच ती ३१% वरून ३४% केली होती. आता ४% ने वाढल्यानंतर ते ३८% होईल. सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यास देशातील ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

    नवी दिल्ली – केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) ४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

    गेल्यावेळी सरकारने मार्चमध्ये DA वाढवला होता. तो १ जानेवारी २०२२ पासून लागू झाला. मार्चमध्ये, सरकारने डीएमध्ये ३% वाढ केली होती. म्हणजेच ती ३१% वरून ३४% केली होती. आता ४% ने वाढल्यानंतर ते ३८% होईल. सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यास देशातील ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

    पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला ३ महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. आता या योजनेचा लाभ डिसेंबर २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. यापूर्वी ही योजना सप्टेंबर २०२२ रोजी संपत होती. केंद्राच्या या निर्णयामुळे देशातील ८१ कोटींहून अधिक जनतेला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. आता देशातील गरजूंना डिसेंबर २०२२ पर्यंत मोफत रेशन मिळत राहील.