डेंजर सीरियल किलर पोलिसांच्या ताब्यात; विकृत मानसिकतेतून केली चार मुलींची हत्या; स्वत:च फोन करुन द्यायचा हत्या केल्याची माहिती

हरयाणातील फरीदाबादमध्ये सीरियल किलरचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. एका कॉलेज तरुणीच्या हत्येप्रकरणी सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली असता त्याच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली. या आरोपीने याआधी आणखी तीन मुलींची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. गेल्या दोन वर्षांत या सुरक्षा रक्षकाने चार मुलींच्या हत्या केल्या असून या प्रकाराने पोलिसही हादरले आहेत. दरम्यान, आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे(Danger serial killer in police custody; Murder of four girls due to perverted mentality).

    फरीदाबाद : हरयाणातील फरीदाबादमध्ये सीरियल किलरचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. एका कॉलेज तरुणीच्या हत्येप्रकरणी सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली असता त्याच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली. या आरोपीने याआधी आणखी तीन मुलींची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. गेल्या दोन वर्षांत या सुरक्षा रक्षकाने चार मुलींच्या हत्या केल्या असून या प्रकाराने पोलिसही हादरले आहेत. दरम्यान, आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे(Danger serial killer in police custody; Murder of four girls due to perverted mentality).

    फरीदाबाद येथे 31 डिसेंबर रोजी एका कॉलेज तरुणीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आली होती. ही विद्यार्थिनी आपल्या घरून आजी-आजोबांकडे जायला निघाली असता वाटेतूनच तिचे अपहरण करण्यात आले होते. या हत्याप्रकरणाने एकच खळबळ उडाली होती. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनेच याबाबत फोन करून मुलीच्या कुटुंबीयांना माहिती दिली होती. त्यानंतर सुरक्षा रक्षक असलेला आरोपी सिंहराज याला वजीरपूर मास्टर रोज येथून अटक करण्यात आली. तो हत्या झालेल्या मुलीच्या वडिलांचा मित्र व आजी-आजोबांच्या परिचयातील असल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आरोपीने तरुणीची छेड काढली होती. याबाबत वाच्यता होईल या भीतीने त्याने या तरुणीची हत्या केली, असेही उघड झाले आहे.

    पोलिसांच्या तपासात सिंहराज याची क्राइम कुंडलीच समोर आली आहे. तो सीरियल किलर असल्याचेही त्यातून स्पष्ट झाले आहे. डिसेंबर 2019 मध्ये त्याने एका 14 वर्षीय मुलीची हत्या केली होती. त्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये त्याने या मुलीला ओळखणाऱ्या एका 12 वर्षीय मुलीची हत्या केली. त्यानंतर गेल्यावर्षी मे महिन्यात एका 15 वर्षीय मुलीची हत्या केल्याची कबुलीही त्याने दिली आहे. या मुली बेपत्ता असल्याची नोंद पोलिस ठाण्यात असून त्यांची हत्या झाल्याचे आता समोर आले आहे. यापैकी एकही मृतदेह हाती लागलेला नाही. हत्या केल्यानंतर मृतदेह गोणीत भरून वस्तीबाहेर नेले आणि नंतर नाल्यात फेकले अशी कबुलीही आरोपीने दिली आहे. आरोपीने विकृत मानसिकतेतून या हत्या केल्याचेही स्पष्ट झाले आहे.

    हे सुद्धा वाचा
    • 2022