Give loans and licenses to buy helicopters to go to the farm A woman farmer from Madhya Pradesh wrote a letter to the President

कंधारमध्ये पूरस्थितीत मदतीसाठी तालिबानने सोमवारी अनेक हेलिकॉप्टर पाठवल्याची माहिती आहे. याच वेळी हेलिकॉप्टरच्या पायलटच्या निष्काळजीपणामुळे हे हेलिकॉप्टर अवघ्या ४० सेकंदात क्रॅश झाले. हा अनाडी पायलटही या अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे. या तालिबानी पायलटचा मुर्खपणा आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आता या व्हिडिओची टिंगल करण्यात येते आहे.

    काबूल : अमेरिकेच्या अब्जावधी डॉलर्सच्या हेलिकॉप्टरवर कब्जा करुन बसलेल्या तालिबानी दसशतवाद्यांना या हत्यारांचे मोल अद्याप समजलेले नाही. त्यामुळे एखाद्या अनाड्याप्रमाणे ते ही हेलिकॉप्टर्स आणि शस्त्रास्त्रे वापरत आहेत. कंधार शहरात अशाच एका अनाडी तालिबानी पायलटने, एक अमेरिकन हेलिकॉप्टर हवेमध्ये उघडवले आणि क्षणार्धात ते दुर्घटनाग्रस्त झाले. इतकेच नाही तर या पायलटने इतक्या धोकादायक पद्धतीने हे हेलिकॉप्टर उडवले की, त्यामुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या बघ्यांचा जीवही संकटात सापड़ला होता.

    कंधारमध्ये पूरस्थितीत मदतीसाठी तालिबानने सोमवारी अनेक हेलिकॉप्टर पाठवल्याची माहिती आहे. याच वेळी हेलिकॉप्टरच्या पायलटच्या निष्काळजीपणामुळे हे हेलिकॉप्टर अवघ्या ४० सेकंदात क्रॅश झाले. हा अनाडी पायलटही या अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे. या तालिबानी पायलटचा मुर्खपणा आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आता या व्हिडिओची टिंगल करण्यात येते आहे. हेलिकॉप्टर उडवण्यासाठी शिक्षण, कौशल्य आणि अनुभवाची गरज असते, असा सल्ला नेटकरी मंडळी आता तालिबानला देत आहेत.

    ‘हेलिकॉप्टर उडवणे म्हणजे गाढवांचे धावणे नव्हे’

    स्वताला कर्नल रहमान रहमानी म्हणणाऱ्या एका यूझरने लिहिले आहे की हा मुर्खपणा तालिबानींना जीव घेईल. हेलिकॉप्टर उडवणे म्हणजे गाढवे पळवणे नव्हे, अशी टीकाही रहमानीने केली आहे. अफगाणिस्थानवर कब्जा केल्यानंतर, तालिबानला अनेक हेलिकॉप्टर मिळाले आहेत. त्यात अमेरिकेसह भारतातील काही हेलिकॉप्टर्सचाही समावेश आहे. तालिबानी अनेकदा तालिबानी सैन्यासोबत या हेलिकॉप्टर्सचेही प्रदर्शन करीत असते.

    सत्तेत आल्यापासून तालिबानमध्ये सातत्याने मानवाधिकारांचे उल्लंघन होते. तालिबानने दुकानाच्या बाहेर उभ्या करण्यात आलेल्या मॉडेल्सचे पुतळ्यांचे शरच्छेद केले आहेत. सोशल मीडियावर या पुतळ्यांच्या शिरच्छेदाचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत. तालिबानने या मॉडेल्सच्या पुतळ्यांना मूर्ती म्हटले आहे. मूर्तीपूजा अमान्य म्हणून मूर्ती अमान्य या न्यायाने या पुतळ्यांचे शिरच्छेद करण्यात येत आहेत. इस्लाम, शरिया कायद्याचा कडवा अर्थ काढण्यात येत असून, इस्लामिक राष्ट्र करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न तालिबानकडून होतोय.