इंदूरमध्ये मंदीर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 35 वर! केंद्र आणि राज्यसरकाडून मदत जाहीर, अद्यापही बचावकार्य सुरू

सध्या या दुर्घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये पायरीच्या विहिरीत अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा कसा प्रयत्न करण्यात येत आहे. छत कोसळल्यानंतर पायरीच्या विहिरीत अडकलेले लोक जीव वाचवण्यासाठी पायऱ्यांच्या बाजूला बांधलेल्या पायऱ्यांवर चढत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधील (Indore) बेलेश्वर मंदिरात काल दुपारी एक मोठी दुर्घटना (Indore Temple Accident) घडली. हवन आणि पूजा सुरू असताना अचानक मंदिरातील विहिरीवरील छत कोसळले. या अपघातातील मृत्यूंचा आकडा 35 वर गेला असून आतापर्यंत 18 जणांना वाचवण्यात यश आले आहे. बचावकार्य अद्यापही सुरुच असून 15 एनडीआरएफ, 50 एसडीआरएफ आणि 75 लष्कराचे जवान बचाव कार्यात सहभागी आहेत.

गुरूवारी सकाळी मंदिरात हवन पूजेचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी जमा झाली होती. लोक आपापल्या जागेवर पूजा करण्यासाठी उभे असताना त्यावेळी अचानक त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि सगळे लोक सुमारे 50 फूट खोल खड्ड्यात पडले. झालेल्या अपघातामुळे कुणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही.

शिढीच्या साहाय्याने लोकांची काढण्यात आलं बाहेर

सध्या या दुर्घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये पायरीच्या विहिरीत अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा कसा प्रयत्न करण्यात येत आहे. छत कोसळल्यानंतर पायरीच्या विहिरीत अडकलेले लोक जीव वाचवण्यासाठी पायऱ्यांच्या बाजूला बांधलेल्या पायऱ्यांवर चढत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यामध्ये लहान मुलांसह महिलांचाही आहोत. बचावकर्ते पायऱ्यांमध्ये शिडी टाकून आणि दोरीने बांधून लोकांना बाहेर काढत होते.तर, दुसरीकडे बचावकार्य सुरू असताना दुसरीकडे लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याचवेळी विहिरीचे पाणीही बाहेर काढले जात होते. त्यासाठी मोटार पंप बसविण्यात आले. याशिवाय पाणी आणि चिखल भरण्यासाठी महापालिकेचे टँकरही मागवण्यात आले होते.

केंद्र आणि राज्याकडून आर्थिक मदत जाहीर 

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या संपूर्ण घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार आहे. याशिवाय पीएम नॅशनल रिलीफ फंडातून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.