केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच वाढ होण्याची शक्यता

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central government serevice) महागाई भत्त्यात (DA) मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साधारण १ जानेवारी आणि १ जुलैपासून महागाई भत्ता वाढवण्याची पद्धत आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचारी (Central government serevice)  १ जुलै रोजी महागाई भत्त्यात (DA) वाढ होणार असल्याची प्रतिक्षा करत आहेत.

    नवी दिल्ली : तुम्ही जर केंद्रीय कर्मचारी (Central government serevice) असाल तर, तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची (IMP News) आहे. कारण केंद्र सरकारकडून आपल्यासाठी एक खुशखबर आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central government serevice) महागाई भत्त्यात (DA) मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साधारण १ जानेवारी आणि १ जुलैपासून महागाई भत्ता वाढवण्याची पद्धत आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचारी (Central government serevice)  १ जुलै रोजी महागाई भत्त्यात (DA) वाढ होणार असल्याची प्रतिक्षा करत आहेत. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता मिळतो. हा महागाई भत्ता ३८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची अपेक्षा आहे.

    दरम्यान, दिवसेंदिवस वाढती महागाई, (Rising inflation) ईएमआयमध्ये (EMI) होत असलेली वाढ तसेच दैनंदिन वस्तूंच्या वाढत जाणाऱ्या किंमती यामुळं सर्वंच कंटाळले आहेत, अशा परिस्थितीत जर महागाई भत्त्यात वाढ केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. महागाईच्या आकडेवारीनुसार, जानेवारी आणि जुलै महिन्यात वर्षातून दोनदा DA आणि DR मध्ये सुधारणा करण्यात येते. त्यामुळं महागाई भत्त्यात वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांना दिलासा मिळू शकतो.

    महागाई भत्ता (DA) वाढल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून ३९ टक्क्यांपर्यंत वाढवल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांचा पगार ८ हजार रुपयांवरून २७ हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम ४७ लाख कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांवर होणार आहे. महागाई भत्त्यात वाढ होणार असल्यामुळं कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.