दिल्ली अध्यादेशावर आज लोकसभेत चर्चा की गदारोळ; भाजपने सर्व खासदारांना जारी केला व्हीप,काय आह विधेयक?

हे विधेयक मंजूर होण्यासाठी भाजपाकडून आपल्या सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. खासदारांनी हे विधेयक मंजूर करण्यासाठी सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले. त्यामुळं यावर चर्चा होताना, गदारोळ व गोंधळ होण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली – दिल्लीत संसदीय पावसाळी अधिवेशन (Parliamentary Monsoon Session) सुरु आहे. मात्र सभाृहात मणिपूर आणि दिल्ली विधेयकावरुन सत्ताधारी व विरोधक आमनेसामने येत गदारोळ, गोंधळ घालत आहेत. दरम्यान, आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा  10 वा दिवस आहे. दिल्लीतील (Delhi) अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगशी संबंधित विधेयक काल लोकसभेत मांडण्यात येणार असून, आज या विधेयकावर चर्चा होणार की गोंधळ याची सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान, हे विधेयक मंजूर करण्यात येईल असं बोललं जातंय. या विधेकाला विरोधकांनी विरोध केला आहे. (debate on delhi ordinance in lok sabha today or uproar bjp issues whip to all mp what is bill)

    भाजपाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी…

    दरम्यान, दुसरीकडे 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान अविश्वास ठरावावर चर्चा होणार आहे. लोकसभेच्या व्यवसाय सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑगस्टला देऊ शकतात. तर आज हे विधेयक लोकसभेत मांडले जाणार असून, मंजूर होण्याची शक्यता आहे, हे विधेयक मंजूर होण्यासाठी भाजपाकडून आपल्या सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. खासदारांनी हे विधेयक मंजूर करण्यासाठी सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले. त्यामुळं यावर चर्चा होताना, गदारोळ व गोंधळ होण्याची शक्यता आहे.

    विधेयक मंजूर होणार?

    मंगळवारी मणिपूरच्या मुद्द्यावर तात्काळ चर्चा न झाल्यामुळे विरोधी आघाडी भारताच्या सदस्यांनी सभात्याग केला. विरोधी पक्षाच्या वतीने मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मणिपूर प्रश्नावर चर्चेसाठी वेळ मागितला आहे. गेल्या 9 दिवसांपासून मणिपूर मुद्द्यावरून विरोधी पक्ष दररोज सभागृहात गदारोळ करत आहेत, त्यामुळे सभागृहाचे कामकाज विस्कळीत होत आहे. मंगळवारीही विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. यानंतर आज दिल्लीच्या विधेयकावर चर्चा होणार आहे.